Kurla Bus Accident saam tv
मुंबई/पुणे

Kurla Bus Accident : इथे ओशाळली माणुसकी! कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरले; घटना कॅमेऱ्यात कैद,VIDEO

Kurla Bus Accident Update : कुर्ल्यातील बुद्ध कॉलनीत सोमवारी अपघाताची भयंकर घटना घडली. या अपघातादरम्यान एका मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्याचाही प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही

मुंबई : कुर्ला बेस्ट अपघाताची सोमवारी घटना घडली. या घटनेदरम्यान एक काळीमा फासणारी देखील घटना समोर आली आहे. कुर्ला बेस्ट अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरी गेल्याची घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कन्नीस अन्सारी असे नाव असलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारानंतर इथे ओशाळली माणुसकी अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. या बेस्ट बसच्या बसच्या अपघातात तरुणींसह एका ५५ वर्षीय कन्नीस अन्सारी या महिलेचाही मृत्यू झाला. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याच मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

कन्नीस अन्सारी या परिसरातील दवाखान्यात काम करायच्या. सोमवारी रात्री त्यांना ८ वाजता क्लिनिकवर पोहोचायचे होते. मात्र, त्यांनी १ तास उशीर होणार असल्याचे सांगितले. मात्र, काही वेळानंतर या अपघातात त्यांच्या मृत्यूची बातमी हाती आली. याच कन्नीस अन्सारी यांच्या हातातील बांगड्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. कुर्ल्यातील हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

कुर्ला बस अपघातात ५५ वर्षीय कन्नीस अन्सारी यांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर मृत कन्नीस यांच्या हातातील बांगड्या चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मोबाईल व्हिडिओत दोन अनोळखी इसम महिलेच्या हातातील बांगड्या चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बेस्ट बसच्या खाली निपचित पडलेल्या महिलेच्या हातातील बांगड्या चोरी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर नेटकऱ्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी काँग्रेसचा नेता अडचणीत; तब्बल २० वर्षांनी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Maharashtra Live News Update : एलपीजी टंचाईने जळगावकर हैराण; एजन्सी बंद, ग्राहकांचा संताप

Coconut Milkshake Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार 'नारळाचा मिल्कशेक', एकदम सोपी आहे रेसिपी

आधी राजकीय ड्रामा, नंतर बहिष्कार नाट्य; साताऱ्यात युती फुटली, पडद्यामागं काय काय घडलं?

Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT