crime news  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात चाललंय काय? कोयता गँगचा रात्री मोकळ्या मैदानात झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला

पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात (Pune) कोयत्याने केलेल्या हल्ल्यात जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजीनगर भागात असलेल्या मैदानावर झोपलेल्या नागरिकावर कोयता गँगने (Koyta Gang) हल्ला केला आहे.

पूर्ववैमनस्यातून ज्येष्ठ नागरिकावर हल्ला

जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणांनी ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील एका मोकळ्या मैदानावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह मोकळ्या मैदानावर रात्री झोपले होते. त्यावेळी कोयता गँगने हातात कोयते घेऊन जोरजोरातून हल्ला करून परिसरात दहशत माजवत हल्ला केला

फिर्याद सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला.

या प्रकरणी दाद्या बगाडे ,दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा शोध सुरू आहे.ॉ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Maharashtra News Live Update: पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

SCROLL FOR NEXT