Konkan Railway Ganpati Special 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Ganpati Special Trains: कोकण रेल्वे अवघ्या 8 मिनिटात फुल्ल! गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट बुकींगमध्ये काळाबाजार?

Konkan Railway Ganpati Special 2024: गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. मात्र अवघ्या 8 मिनिटात या रेल्वे गाड्यांच्या तिकीटाचे बुकिंग फुल्ल झालं आहे.

विलास काटे

गणपतीत कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. मात्र बुकिंग सुरू होताच 8 मिनिटातच कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांची सगळी तिकिटं संपली आहे. त्यामुळे प्रवाशांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. तिकीट विक्रीत काळाबाजार झाल्याचीही चर्चा आहे, कारण गणपती स्पेशल 202 गाड्यांच्या तिकीटाची विक्री अवघ्या 8 मिनिटातच झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फरक बसला आहे.

यातच गणेशोत्सवाचा काळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होतो, याला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनेचा वतीने करण्यात आली आहे. ही बाबा बाब चिंताजनक आहे, असंही रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणं आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचा यात हात असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यानी सांगितलं आहे. तसेच अधिवेशन सुरू आहे, याचा बाबतीत खासदार आणि रेल्वे मंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच गणेश उत्सवाचा काळात जर स्लीपिंग कोच वाढवले, तर गर्दी कमी होईल, अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.

काय आहे रेल्वे प्रवासी संघटनेचा आरोप?

रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी आरोप केला आहे की, ''रेल्वे प्रशासन काळाबाजार करणाऱ्या चोरांना मिळालेले आहेत. हा प्रश्न वारंवार उद्भवत असताना, क्षणात तिकीट बुक होतात आणि काळाबाजार होतो. ही लाजिरवाणी बाब आहे, इतक्या गाड्या सोडूनही काही क्षणात तिकीट बुक होतात.''

देशमुख म्हणाले, ''यामध्ये रेल्वेचे अधिकारी गुंतलेले असल्यामुळे चोर चोरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि प्रवाशांचे हाल होतात. इतकं आधुनिक तंत्रज्ञान असतानाही काळाबाजार होत आहे, ही चिंताजनक गोष्ट आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT