girl Veeranshi birthday her father booked theater SaamTV
मुंबई/पुणे

लेकीच्या बर्थडेला 'छावा' चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक, कोल्हापुरातल्या बापाची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा

Girl Birthday Theater Booked for Chhaava Movie : सुजित प्रभावळे यांनी कोल्हापुरातील बाल संकुलमधील गरीब आणि अनाथ मुलांसाठी 'छावा' या चित्रपटाचा शो आयोजित केला होता.

Prashant Patil

कोल्हापूर : शिवजयंतीचे औचित्य साधत कोल्हापुरातील शिवभक्त सुजित प्रभावळे यांनी त्यांच्या १ वर्षीय वीरांशी हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या 'छावा' या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं. आज शिवजयंती आणि वीरांशी हिचा वाढदिवस देखील आहे. यामुळे सुजित प्रभावळे यांनी कोल्हापुरातील बाल संकुलमधील गरीब आणि अनाथ मुलांसाठी 'छावा' या चित्रपटाचा शो आयोजित केला होता. कोल्हापुरातील आईनॉक्स थिएटरमध्ये या विशेष शोचे आयोजन करण्यात आलं होतं.

'छावा' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवत आहे. दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि प्रभावी संवाद यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास भव्य स्वरूपात उलगडणारा हा चित्रपट केवळ युद्धाची शौर्यगाथा सांगत नाही, तर त्यांची बुद्धिमत्ता, राज्यकारभारातील कौशल्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदानही अधोरेखित करतो.

तब्बल १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आठवड्याच्या आतच १६५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. थिएटरमध्ये 'छावा' पाहताना प्रेक्षकांचा जल्लोष, जयघोष आणि अंगावर काटा आणणारे क्षण हेच या चित्रपटाच्या यशाचा खरा पुरावा आहेत. मात्र, या चित्रपटातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे संवाद लिहिणाऱ्या इरशाद कामिल यांनी यासाठी एकही रुपया घेतलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT