Central Railway News Saam tv
मुंबई/पुणे

Diva-Chiplun Memu Train : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! दिवा-चिपळूण मेमोला कायमस्वरूपी हिरवा कंदील, जाणून घ्या वेळापत्रक

Central Railway News : मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवा कायमस्वरूपी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकलला पश्चिम कोस्टल मार्गावरील २६ स्थानकांवर थांबा देण्यात आला असून प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Alisha Khedekar

मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा चिपळूण मेमू लोकल सेवा कायमस्वरूपी सुरु केली

प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली

ही लोकल पश्चिम कोस्टल मार्गावरील २६ स्थानकांवर थांबणार आहे

दिवा ते चिपळूण प्रवास कालावधी फक्त ६ तास ४५ मिनिटांचा असेल

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे दिवा रेल्वे स्थानक ते चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत मेमू लोकल रेल्वे सेवा प्रवाशांसाठी कायमस्वरूपी सुरू करण्यात आली असून मेमू लोकलच्या वेळापत्रकात काहीसे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही लोकल पश्चिम कोस्टल रेल्वे मार्गावरील तब्बल २६ रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ काळापासून कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि कोकणवासियांनी दिवा ते चिपळूण लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु बऱ्याच वेळा मध्य रेल्वे प्रशासनाकडून या मागणीला दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र २० ऑगस्टपासून गणेशोत्सवाच्या हंगामी काळामध्ये दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवा तात्पुरती सुरू करण्यात आली आहे. दरम्यान दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा रेल्वे स्थानकांसाठी २ मेमू लोकल उपलब्ध केल्या आहेत.

बऱ्याच कालावधीने मध्य रेल्वे प्रशासनातर्फे दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवेला थांबा देण्यात आला. परंतु काही स्थानिकांच्या आणि कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव आणि वीर रेल्वे स्थानकातून नियमित पनवेल, दिवा स्थानकासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागण्यांची रेल्वे प्रशासनाकडून पूर्तता करत १५ ऑगस्टपासून दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवा कायम करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले.

यादरम्यान आता मेमू लोकलच्या वेळापत्रकात देखील काहीसे बदल घडवण्यात आले आहेत. एक मेमू लोकल दिवा रेल्वे स्थानकातून सकाळी ७:१५ वाजता चिपळूण रेल्वे स्थानकासाठी रवाना होईल तसेच दुसरी मेमू लोकल चिपळूण रेल्वे स्थानकातून दुपारी १२:०० वाजता दिवा रेल्वे स्थानकासाठी धाव घेईल. दिवा ते चिपळूण मेमू लोकल पश्चिम कोस्टल रेल्वे मार्गावरील तब्बल २६ रेल्वे स्थानकावर थांबेल. तसेच त्यांपैकी पनवेल, पेण , रोहा , माणगाव या ४ मुख्य जंक्शनवर क्रॉसिंगसाठी थांबा घेण्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवेमुळे या रेल्वे मार्गावरून प्रवाशी अवघ्या ६ तास ४५ मिनिटात निश्चित स्थानकावर पोहोचतील, असे देखील दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अॅग्रीमेंट रिलेशनशीप, लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? मुलींना फसवण्यासाठी नवं जाळं?

RCB Player: १५ वर्षांच वनडे करिअर संपलं, ढसाढसा रडत सोडलं मैदान, आरसीबीतील महत्त्वाच्या खेळाडूची निवृत्ती

Monday Horoscope : भाग्यचे द्वार आपोआप खुले होणार; ५ राशींच्या लोकांच्या हातून पुण्यकारक गोष्टी घडणार

पंकजा मुंडेंचा जरांगेंपुढे मैत्रीचा हात? एकत्र येऊन समाजातील दरी मिटवू

Maharashtra Politics: तुमचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल, शिंदेंना मोदी-शाहांची तंबी, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT