Praful Patel Saam tv
मुंबई/पुणे

Praful patel NCP Working President: गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष ते माजी केंद्रीय मंत्री; कसा आहे शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास?

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापन दिनामित्त शरद पवार यांनी अखेर 10 जून रोजी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची निवड केली आहे .तर राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल कोण आहेत जाणून घेऊया. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या महिन्यात राजीनाम्याचा बॉम्ब टाकून एकच खळबळ माजवली होती. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नवा चेहरा कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर 10 जून रोजी, राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापन दिनामित्त शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची निवड केली आहे. तर राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल कोण आहेत जाणून घेऊयात.

कोण आहेत प्रफुल्ल पटेल?

प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा मोठा चेहरा मानलं जातं. प्रफुल्ल मनोहरभाई पटेल असं पटेल यांचं पूर्ण नाव आहे.पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 साली झाला. राजता मनोहरभाई पटेल यांचे ते पुत्र आहेत. पटेल यांचे आई-वडील दोघेही राजकारणी होते. प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत.

प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्रिपद देखील भूषवलं आहे. पटेल आजवर 4 वेळा लोकसभेवर निवडून आलेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत. 2009 ते 2014 पर्यंत भंडारा गोंदिया लोकसभा खासदार देखील होते. 2014 पासून ते राज्यसभा सदस्य आहेत.

प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास

प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास 1985 वर्षापासून सुरू झाला. प्रफुल्ल पटेल हे 1985मध्ये गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. 1991 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत 10 व्या लोकसभेसाठी निवडून आले. 1996 आणि 1998 मध्ये ते 11व्या लोकसभा आणि 12व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले.

1991-1996 मध्ये पटेल यांनी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या सल्लागार समिती काम केलं.1994-1995 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीही काम केले आहे. तर 1995-1996 मध्ये गृह व्यवहार समितीसह अनेक संसदीय समित्यांवर काम केले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर

1996-1997 मध्ये वित्त समिती , आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची सल्लागार समितीत काम केले आहे. पुढे 2000 मध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून आले. 2006 मध्ये त्यांची दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाली आणि 2009 मध्ये चौथ्यांदा 15 व्या लोकसभेवर निवडून आले. 2016 मध्ये ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आले. 2004 ते 2011 पर्यंत पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री होते. 2004 ते 2011 पर्यंत पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री होते.

या भूमिकेत, सरकारने देशांतर्गत विमान सेवा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 40% वरून 49% पर्यंत वाढवली. 19 जानेवारी 2011 रोजी, पटेल यांना नागरी विमान वाहतूक खात्यातून मुक्त करण्यात आले आणि ते अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री बनले. 9 जानेवारी 2013 रोजी, पटेल यांनी भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहने सादर करण्यासाठी राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन (NEMMP) 2020 रोडमॅप लाँच केला.

पटेल यांनी राजस्थानमधील सांभर तलावाजवळ जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प अंदाजे 4000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी नियोजित होता. परंतु पर्यावरण गटांच्या विरोधानंतर, प्रकल्पाची जागा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील खाराघोडा येथे हलविण्यात आली.

2009 ते 2022 पर्यंत भारतीय फुटबॉल नियामक मंडळ आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ)चे ते अध्यक्ष होते. 2015 मध्ये बहरीन येथे झालेल्या AFC काँग्रेसमध्ये ते आशियाई फुटबॉल महासंघाचे SAFF प्रदेशाचे उपाध्यक्ष बनले. डिसेंबर 2016 मध्ये त्यांची आशियाई फुटबॉल महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2017 मध्ये चार वर्षांच्या कालावधीसाठी फिफा वित्त समितीचे सदस्य झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : विधानसभेत पिता-पुत्र आमनेसामने; शहादा- तळोदा मतदारसंघात रंगणार लढत

Maharashtra News Live Updates : शिवसेना उमेदवारांची यादी आज होणार प्रसिद्ध? ६० ते ७५ उमेदवारांच्या नावांची होऊ शकते घोषणा

Suzie Bates ची भन्नाट स्टोरी! बास्केटबॉलपटूने न्यूझीलंडला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिलं

Nana Patole: भाजप विधानसभा निवडणुकीत राज्यात २० ते ३० जागांच्यावर जाणार नाही, नाना पटोले यांचा मोठा दावा

Madha Contituency News : बबन शिंदेंची निवडणुकीतून माघार, म्हणाले.. | Video

SCROLL FOR NEXT