Kirit Somaiya And Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya On Uddhav Thackeray: 'सामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केलं', किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

Pune Jambo Covid Center: जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणाविरोधात किरिट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune News: पुण्यातील (Pune) जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणी भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एखदा आक्रमक झाले आहेत. या भ्रष्टाचार प्रकरणाविरोधात किरिट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावेळी याप्रकरणावरुन त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत सामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले असल्याचा गंभीर आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज शिवाजीनगर पोलिस ठाण्याला भेट देत सुजित पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. जम्बो कोविड सेंटर प्रकरणी किरीट सोमय्या यांनी भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०५, ४०६, ४६३, ४६४, ४६५, ४७०, ४७१ आणि ३४ अंतर्गत तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना लाईफलाईन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसकडून दिले गेलेले कागदपत्र बनावट असल्याचा दावा केला.

किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, 'कोरोना रुग्णांचे नुकसान संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यामुळे झाले. त्यांच्यामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ही कंपनी अस्तित्वात नव्हती. त्यांना पीएमआरडीएने कंत्राट दिले. तत्कालीन पालकमंत्री अजित पवारांनी आदेश दिले आणि कंपनीला ब्लॅकलिस्ट केले. त्यानंतर देखील सरकारकडून या कंपनीविरोधात कोणता गुन्हा दाखल केला गेला नाही.' असे सांगत किरीट सोमय्या यांनी 'याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.', अशी मागणी केली.

तसंच, 'यानंतर वरळीचे मंत्री आदित्य ठाकरेनी आयसीयूचे कंत्राट दिले. याप्रकरणाची देखील चौकशी झाली पाहिजे.', अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली. तसंच त्यांनी सामान्य जनतेचा जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचा गंभीर आरोप केला. 'जर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर मी पुढच्या शनिवारी पुन्हा येईल.', असे देखील त्यांनी यावेळी खडसावून सांगितले. तसंच 'माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे', अशी मागणी देखील त्यांनी केली.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ५ फेब्रुवारी रोजी ट्वीट करत संजय राऊत (Sanjay Raut) भागिदार असलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट देऊन तब्बल 100 कोटींचा जम्बो कोविड घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी ते तक्रार दाखल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात निघाले होते. पण महापालिकेत शिवसैनिक आणि सोमय्या यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची होती. यावेळी शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता या प्रकरणावर किरिट सोमय्या पुन्हा आक्रमक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT