kirit somaiya & uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

Hindutva: उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बाटलेलं, सोनिया माँ पुढे झुकलेलं : साेमय्या (व्हिडिओ पाहा)

बीकेसी मैदानावर शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमय्यांचा समाचार घेतला हाेता.

जयश्री मोरे

मुंबई : उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे हिंदुत्व (hindutva) बाटलेलं आहे. उद्धव ठाकरे हे सोनिया (sonia gandhi) माँ यांच्या पुढे झुकलेले आहेत अशी टीका भाजप नेते किरीट साेमय्या (kirit somaiya) यांनी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज (रविवार) येथे (mumbai) केली. (kirit somaiya latest marathi news)

शनिवारी मुंबई येथे बीकेसी मैदानावर (bkc ground) शिवेसेनेची संपर्क अभियान अंतर्गत जाहीर सभा झाली आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. यामध्ये ठाकरेंनी किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली. त्यास आज (रविवार) साेमय्यांनी प्रत्युत्तर दिले.

सोमय्या म्हणाले कोणत्या रश्मी ठाकरे असली आहेत आणि काेणत्या नकली हे लवकरच सर्वांना समजेल. रश्मी ठाकरे (rashmi thackeray) खाेटे वागणार नाहीत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लबाड आहेत. १९ बंगले माझ्याकडे नव्हते असे रश्मी ठाकरेंनी नमूद केले. असली आणि नकली याचा लवकरच करारा जवाब मिलेगा असे साेमय्या यांनी स्पष्ट केले.

गिरगावातील गोल देऊळ मंदिरात कधी घंटानाद आणि आरती बंद झाली नव्हती पण हिरव रंग परिधान केलेल्या उद्धव ठाकरे यांनी घंटा काढून घेतली आहे. काल मी तिथे जाऊन आरती केली आणि घंटानाद सुद्धा केला असेही साेमय्यांनी उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कसे बेगडी आहे याचे उदाहरण देत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच हिंदुत्व बाटलेले आहे. उद्धव ठाकरे हे सोनिया माँ यांच्या पुढे झुकलेले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT