किरण गोसावी Saam Tv
मुंबई/पुणे

....'तो' मोबाईल नंबर समीर वानखेडेंचा नाहीच!

किरण गोसावीने पुजा ददलानीची दिशाभूल करण्यासाठी प्रभाकर साईलचा मोबाईल नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

सूरज सावंत

मुंबई : कार्डिलिया क्रुझ Cardilia Cruise Drugs Case प्रकरणातला पंच असलेला किरण गोसावी याने शाहरूख खानची Shaharukh Khan मॅनेजर पुजा ददलानी व इतरांची दिशाभूल करण्यासाठी दुसरा पंच प्रभाकर साईल याचा मोबाईल नंबर एनसीबीचे NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे Samir Wankhede यांच्या नावाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केल्याचे समोर आले आहे. Kiran Gosavi impersonated Samir Wankhede number

प्रभाकर साईलनेच ही माहिती मुंबई पोलिसांनी Mumbai Police एसआयटी वर एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमला दिली आहे. क्रुझवरच्या छाप्याच्या दिवशी गोसावी व वानखेडे यांच्यात कुठलेही संभाषण झाले नसल्याचे या चौकशीत समोर आले आहे. किरण गोसावी सध्या फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांच्या Pune Police ताब्यात आहे.

एनसीबीने क्रुझवर छापा टाकला त्या दिवशी गोसावी व पुजा ददलानी यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान तू मला मोबाईलवर फोन कर असे गोसावीने साईलला सांगितले होते. त्यावेळी गोसावीने साईलचा नंबर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला होता. प्रभाकरशी बोलताना गोसावी समोरच्या व्यक्तीला आपण वानखेडे यांच्याशी बोलत असल्याचे भासवत होता. त्यावेळी तो सर..सर असे म्हणत प्रभाकरशी बोलत होता, हे देखिल साईलने एनसीबी आणि पोलिसांना सांगितले आहे. Kiran Gosavi impersonated Samir Wankhede number

साईलने दिलेल्या या माहितीमुळे एनसीबीच्या तपासाला वेग आला आहे. साईलने सलग दोन दिवस एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमपुढे आपला जबाब नोंदवला आहे. आता गोसावीचा ताबा मागण्यासाठी एनसीबी न्यायालयात जाणार आहे. दरम्यान, काल ११.४० वाजेपर्यंत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी केली. सुमारे साडेपाच तास ही चौकशी चालली. कार्डिलिया क्रुझवर त्या दिवशी नक्की काय घडलं याबाबत एनसीबीने आर्यन खानकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT