Pune Crime News गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

'लिव्ह इन रिलेशनशिप', MPSC अन् हत्या; पुण्यात तरुणीच्या खुनानंतर प्रियकर फरार !

जिल्ह्यातील आकुर्डीमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे: जिल्ह्यातील आकुर्डीमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रितू भालेराव असं हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. रितू भालेराव ही मूळची औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील रहिवासी असून ती गेल्या पाच - सहा महिन्यापासून आकुर्डी परिसरामध्ये शाम रामू ढेरे या तरुणांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहत होती. (Pune Crime News)

मात्र, रितूची हत्या झाल्यानंतर श्याम ढेरे हा फरार झाला आहे. रितू पुण्यात (Pune) एमपीएससी परीक्षेची (MPSC) तयारी करत होती. ती पती -पत्नी असल्याच सांगून श्याम ढेरे यांच्या सोबत विठ्ठल वाडी परिसरातील जय मल्हार निवास या ठिकाणी राहायला होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रितू भालेराव ही श्याम ढेरे सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला होती की त्यांनी लग्न केलं होतं ? याचा तपास सध्या निगडी पोलिस (Nigadi Police, Pune) करत आहेत.

रितूच्या त्या मित्राचा शोध घेण्यासाठी निगडी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. तसेच याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (Pune News Latest Updates)

हे देखील पहा-

याबद्दल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती घरमालकाने रविवारी ता. 6 सकाळी सहाच्या सुमारास निगडी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर, पोलिसांनी (Police) आत पाहिले असता त्यांना रितू हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता रितू आणि आणखी एकजण मागील पाच महिन्यापासून पती-पत्नी असल्याचे सांगून आकुर्डीत राहण्यास होते असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT