Khed Food Poisoining News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू

Khed Food Poisoining News: खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून २५ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोहिदास गाडगे

खेड, ता. २० एप्रिल २०२४

जी आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून २७विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये (Dakshana Foundation) देशातील विविध राज्यातून JEE आणि IIT अशा विविध पूर्वपरीक्षांच्या तयारी अभ्यासक्रमासाठी निवासी आहेत. काल रात्री बटाटा भाजी चपाती, डाळ भात असा जेवनाचा मेन्यू होता. ज्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

काल रात्री ५५० विद्यार्थ्यांनी हे जेवन केले होते. ज्यानंतर अनेकांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. याामध्ये २७ विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राजगुरुनगर पोलिसांसह डॉक्टरांची टिम चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे. काही मुलांना ऑक्सिजन लावण्यात आले आहेत. विषबाधा झाल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT