khardi villagers andolan at shahapur tehsil office saam tv
मुंबई/पुणे

Shahapur : भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी खर्डी परिसरातील शेतकऱ्यांचे शहापूर तहसीलवर बेमुदत उपाेषण

Khardi : तीन वर्षांपासून हे शेतकरी विविध कार्यालये, राजकीय पदाधिकारी यांच्याकडे फेऱ्या मारीत आहेत. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचे नमूद केले.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahapur News :

शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याच्या निषेधार्थ खर्डी (khardi) परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी आजपासून शहापूर तहसील (shahapur tashil office) कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहापूर तालुक्याचा नेहमीच जमीन भूसंपादनाच्या बाबतीत ठाणे जिल्ह्यात एक नंबर लागताे. मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील स्थानिक, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाने खर्डी औद्योगिक क्षेत्रासाठी करारनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली असताना देखील आपल्या हक्काच्या भूसंपदांनच्या मोबदल्यासाठी कार्यालयांत चकरा माराव्या लावल्या.

शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील वरस्कोल, खर्डी , घाणेपाडा येथील 300 हेक्टर जमीन खर्डी औद्योगिक क्षेत्रासाठी आरक्षित केलेली आहे. त्यातील 200 हेक्टर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देखील 3 वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. (Maharashtra News)

विशेष म्हणजे यातील बहुतांशी शेतकरी हे अन्य जिल्हा व राज्यातील असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना त्यावेळेस नाममात्र मोबदल्याचे वाटप करण्यात आले होते. अन्य शेतकऱ्यांचे कारारनामे, ताबा पावती करून घेण्यात आले होते. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही.

तीन वर्षांपासून हे शेतकरी विविध कार्यालये, राजकीय पदाधिकारी यांच्याकडे फेऱ्या मारीत असून त्याकडे लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष करीत आहेत असे आंदाेलक शेतक-यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Twitching : डोळे सतत फडफडतात? शुभ-अशुभ नव्हे, शरीर देतेय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Baramati News: 'सोमवेश्वर' निवडणुकीत जय पवारांचा करिश्मा, २१ -० ने विजय; शरद पवार गटाचा दारूण पराभव

ट्रक-मोटारसायकलची समोरासमोर धडक; जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमध्ये हळहळ

Walking Timing: सकाळी ७, दुपारी १२ की संध्याकाळी ७ वाजता...; कोणत्या वेळेला चालणं सर्वात बेस्ट?

SCROLL FOR NEXT