palghar, ashoka boat, palghar police saam tv
मुंबई/पुणे

Palghar : पाेलिसांची अशोका बोट बुडाली अन् जीव वाचवण्यासाठी समुद्रात सुरु झाला थरार...

पाण्याच्या बाटल्यांच्या साह्याने बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली हाेती.

रुपेश पाटील

Palghar News: पालघर पोलिस (palghar police) समुद्रात गस्त घालत असताना झालेल्या दुर्घटनेतून सर्वजण बचावले आहेत. या सर्वांना वाचवण्यात केळवे (Kelwa Beach) सागरी पोलिस आणि स्थानिकांना यश आले आहे. स्थानिक मच्छीमारांच्या लक्ष्मीप्रसाद बोटीच्या (laxmiprasad boat) मदतीने गस्त घालणारी बुडालेली बोटही समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात यश आले आहे.

समुद्रात केळवे ते दातीवरे ह्या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली अशोका बोट (ashoka boat) दातीवरे गावाच्या समोर समुद्रात ७ नोटिकल भागात गेल्यावर बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे तैनात पोलिसांच्या लक्षात आले. आपल्या स्पीड बोटीमध्ये अर्ध्यावर पाणी शिरू लागल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्याच्या (water) बाटल्या कापून त्या द्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली.

समुद्रात सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे तुफानी लाटा उसळत हाेत्या. त्यामुळे बोट लाटावर हेलकावे घेत असल्याने बोटीतील पाणी बाहेर काढणे शक्य होत नव्हते. ह्याच वेळी त्यांच्या स्पीड बोटीतून त्यांचे लाईफ जॅकेटसह अन्य साहित्य वाहून गेले. बोटीतील एका अधिकाऱ्याने केळवे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी गायकवाड यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत मदत मागितली.

गायकवाड यांनी तत्काळ आपले सहकारी कॉन्स्टेबल जयदीप सांबरे, वसंत वळवी, पी. सी. साळुंखे आदी कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. मांगेल वाडीतील हर्षल मेहेर, राकेश मेहर, आतिश मेहेर , रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि रुपेश बंगारा यांच्यासोबत त्यांची लक्ष्मीप्रसाद बोट समुद्रात रवाना केली.

समुद्रात वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असताना मच्छीमारांनी मोठ्या जिद्दीने तासभर प्रवास करत त्या दुर्घटनाग्रस्त बोटीचा शोध घेतला. समुद्रात भरती असल्याने ही बोट भरतीच्या प्रवाहाने दातीवरे गावाकडून टेम्भी गावाच्या समोर वाहत आली होती. मदतीसाठी बोट पोहचल्यावर बुडत असलेल्या अशोका बोटीतील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Maharashtra News)

सर्वजण सुखरुप

सर्वांच्या मदतीने अशोका बोटीत जमलेले पाणी बाहेर काढण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अथक प्रयत्नानंतर अशोका बोट आणि त्यातील चार कर्मचाऱ्यांना सुखरूप केळवेच्या किनाऱ्यावर आणण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT