Badlapur Shri Ram Mahotsav saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Shri Ram Mahotsav : बदलापूरात श्रीराम महोत्सव, साेमवारी मांस, मद्य विक्री बंद ठेवावी : भाजपची मागणी

या चित्र प्रदर्शनात राम जन्मापासून सीता हरण असे सर्व प्रसंग यात दाखवण्यात आले आहेत.

अजय दुधाणे

Badlapur News :

अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ (Ram Mandir Inauguration) निमित्त अंबरनाथ तालुका अध्यात्मिक उत्सव समिती आणि आमदार किसन कथोरे मित्र मंडळ यांच्यावतीने श्रीराम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान बदलापूर मध्ये साेमवारी (ता. 22) मटण, मच्छी तसेच मद्य विक्री बंद ठेवण्याचे आवाहन भाजपाने केले आहे. (Maharashtra News)

बदलापूर शहरातील गांधी चौकात असलेल्या मराठी शाळेच्या पटांगणात हा महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनावर आधारित गीतरामायण व भजन संध्या तसेच या महोत्सवात श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

18 फूट लांब आणि 25 फूट उंच अशी ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. तसेच या श्रीराम महोत्सवात प्रभू श्रीराम कथेवर आधारित भव्य असे चित्र प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनात राम जन्मापासून सीता हरण असे सर्व प्रसंग यात दाखवण्यात आले आहेत.

मटण, मद्य विक्री दुकाने बंद ठेवा

अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडत आहे. त्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त बदलापूर मध्ये चिकन, मटण, मच्छी तसेच मद्य विक्री बंद ठेवण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दिवशी शहरात विविध कार्यक्रम ठेवण्यात आले असल्याने अशा चांगल्या दिवशी कोणत्याही प्रकारे पशु हत्या होऊ नये यासाठी हे आवाहन करण्यात आले असल्याचे भाजप नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी म्हटले आहे. याबाबत नगरपालिका आणि पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचे राजेंद्र घोरपडेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

SCROLL FOR NEXT