KDMC News Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC News: KDMC आयुक्त कार्यलायाबाहेर राडा; आपापसात भिडले पालिका कर्मचारी

KDMC Commissionerate News: कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर पालिका कर्मचारी आपापसात भिडल्याचे आज पाहायला मिळालं. पालिका कर्मचारयास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केलाय.

Sandeep Gawade

KDMC News Update

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर पालिका कर्मचारी आपापसात भिडल्याचे आज पाहायला मिळालं. पालिका कर्मचारयास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केलाय. या घटनमुळे आयुक्त दालनाबाहेर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रमेश पौळकर असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून पौळकर याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

आज मंगळवारी आयुक्तांना नागरिकांना भेटण्याची वेळ असते. अनेक नागरिकांच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी आणि अर्ज असतात त्यासंदर्भात नागरीकांना प्रत्यक्ष भेटून आयुक्तांना सांगण्यासाठी नागरिक आयुक्ताच्या दालनाबाहेर उभे होते. त्यांना सुरक्षा रक्षकांकडून गेटवर टाेकन विचारून सोडले जात होते. या रांगेत पालिका कर्मचारी रमेश पौळकर हे देखील होते. पौळकर एका कामगार संघटनेचे ते काम पाहतात. कामगारांच्या समस्या त्यांनाही मांडायच्या होत्या. यावेळी त्यांना सुरक्षारक्षक अधिकारी सुरेश पवार आणि महिला सुरक्षारक्षक सरिता चरेगावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप पौळकर यांनी केला. या घटनमुळे आयुक्त कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला. नागरिकांनीही पौळकर यांना मारहाण झाल्याचे सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही वेळेकरीता पौळकर यांना आयुक्तांच्या केबीन लगत असलेल्या ठिकाणी बसवून ठेवले होते. थोड्या वेळेनंतर पौळकर यांना बाहेर आणले. त्यांना सुरक्षा अधिकारी पवार व महिला सुरक्षा रक्षक चरेगावकर यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले की, ही घटना आयुक्त दालनाबाहेर घडली आहे. त्यामुळे काही बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक अधिकारी पवार आणि महिला सुरक्षा रक्षक चरेगावकर यांनीही याविषयी काही बोलण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT