Kalyan Dombivli News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli News: ...अन्यथा आठवडाभरानंतर मूक नव्हे ठोक मोर्चा काढू; रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली शहरातील खड्ड्यांबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा, निवेदने,तक्रारी करून देखील खड्डे बुजवले जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापालिकेच्या निषेधार्थ आज महापालिका मुख्यालयाच्या समोर मनसेने मूक मोर्चा काढला.

यावेळी मनसे कार्यकर्ते पदाधिकार्यानी तोंडावर पट्टी व हातात निषेधाचे फलक घेतले होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे निषेधार्थ आज मूक मोर्चा काढला. आठवडाभरानंतर शहरातले खड्डे बुजवले नाही तर ठोक मोर्चा काढू, असा इशारा मनसेने दिला आहे. (Latest Marathi News)

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची दैना उडाली आहे. महापालिकेकडून खड्डे भरण्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांमुळे अपघातांना देखील सामोरे जावे लागतेय. याच खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेला अनेकदा निवेदन दिली तक्रारी केल्या मात्र महापालिका दाद देत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

आज मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय समोर मूक मोर्चा काढत मूक आंदोलन केले.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर म्हणाले, 'कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महापालिकेचे अधिकाऱ्याने माणसं मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. प्रत्येक पावसाळ्यात पूर्ण शहरात खड्डे पडतात आणि अपघात होतात, म्हणून महापालिकेच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन केलं. आज हा मूक मोर्चा काढला आहे, येत्या आठवडाभरानंतर शहरातले सगळे खड्डे भरले नाही तर ठोक मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

SCROLL FOR NEXT