अश्विनी जगताप ३४०६
नाना काटे ११६४
राहुल कलाटे ३१८२
जगताप : 96231
काटे : 78863
कलाटे : 29629
अश्विनी जगताप १७२७८
अश्विनी जगताप ५९६५
नाना काटे १८७०
राहुल कलाटे ४२४
अश्विनी जगताप १३२८३
अश्विनी जगताप ५५७७
नाना काटे २६६७
राहुल कलाटे ४७६
भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा पेठमधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. कसबा पेठ मतदारसंघात तब्बल २८ वर्षांनी भाजपचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
'आजचा विजय हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा आहे, अशी पहिली प्रतिक्रिया मविआचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
अश्विनी जगताप - ५२०४६
नाना काटे - ४२९३३
राहुल कलाटे - १६०६८
मी उमेदवार म्हणून कमी पडलो. हा निकाल मला मान्य आहे. तसेच पक्षाने मला संधी दिली पण मी कमी पडलो माझा पराभव मला मान्य अशी प्रतिक्रिया कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. कसब्यात गेल्या काही दिवसांपासून हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर सुरु होती. ती काटे की टक्कर शेवटपर्यंत पाहायला मिळाली.
कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे अकरा हजार चाळीस मतांनी विजयी झाले आहेत.
विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीची आज, गुरुवारी मतमोजणी सुरू असून, सुरुवातीचे कल येत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा पेठमधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर भाजपचे हेमंत रासने हे पिछाडीवर आहेत. अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाले नसले तरी, विजयाचा आत्मविश्वास असलेल्या धंगेकरांच्या समर्थकांनी आधीच विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
१६व्या फेरीतही रवींद्र धंगेकर मोठ्या आघाडीवर आहेत.
रवींद्र धंगेकर - 60657
हेमंत रासने - 53230
चौदाव्या फेरी अखेरीस रविंद्र धंगेकर आघाडीवर ५२८३१ मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर हेमंत रासने ४७५४६ मतांवर आहे.
कसबा मतदार संघाचे विंद्र धंगेकर हे विजयाच्या जवळ पोहचले आहे. तेराव्या फेरीअखेरधंगेकर यांनी आघाडी कायम ठेवल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
रवींद्र धंगेकर : 48986
हेमंत रासने : 44165
अश्विनी जगताप - ३८२०
नाना काटे - २६८२
राहुल कलाटे - ७८९
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणीच्या मतदानात सुरुवात झाली असून 20 पैकी 12 फेऱ्यांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांची आघाडी कायम ठेवली आहे. हेमंत रासने हे 5211 मतांनी पिछाडीवर आहेत.
३१२२ मतांनी धंगेकर आघाडीवर असून हेमंत रासने पिछाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे.
रविंद्र धंगेकर- 38286
हेमंत रासने- 34022
रवींद्र धंगेकर यांची ३४७४१ मतांनी आघाडी कायम आहे. नवव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे.
अश्विनी जगताप : 28020
नाना काटे : 23083
राहुल कलाटे : 9291
रवींद्र धंगेकर 30,537
हेमंत रासने 27,187
आनंद दवे 100
सातव्या फेरीतील मतं
रवींद्र धंगेकर : 2824
हेमंत रासने : 4270
सहाव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांचीच आघाडी कायम आहे. सुरवातीपासून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.
पाचवी फेरी
अश्विनी जगताप - 3350
नाना काटे - 2851
राहुल कलाटे - 1167
पाचव्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीअखेर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या आघाडी कायम आहे. अश्विनी जगताप यांना 2775 मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना 2159 तर राहुल कलाटे यांना 1058 मत मिळाली आहेत.
चौथ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर आल्याचं चित्र आहे. रवींद्र धंगेकर यांना 14891 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना 14382 मते मिळाली आहेत.
अभिजित बिचुकले कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभा असून आतापर्यंत त्याला फक्त चार मतं मिळाली आहेत.
भाजप उमेदवार अश्विनी जगताप - 7996
महाविकास आघाडी उमेदवार नाना काटे - 7349
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे - 3046
चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीमध्येही अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना 7996, नाना काटेंना 7349 तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 3046 मतं मिळाली आहेत.
पुणे पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 5844 मतांनी आघाडीवर आहेत. तर 2863 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
कसबा मतदर संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर आहे. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप मोठ्या आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहेत आणि नाना काटे यांना 3604 मत मिळाली आहेत. तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत मिळाली आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रविंद्र धंगेकर पोस्टल मतदानात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. पोस्टाने आलेल्या या मतांची मोजणी पहिल्यांदा सुरू झाली यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार
पोस्टल मतांबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम मधून देखील मतांची मोजणीला सुरुवात
इव्हीएम मोजणी ८.३० नंतर सुरुवात होणार
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जागांवर आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी सर्वांनीच मोठा प्रचार केला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे या दोन्ही जागेवरील निवडणुका चांगल्याच गाजल्या होत्या. दरम्यान, आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.