dhananjay Munde  Saam tv
मुंबई/पुणे

Karuna Munde : 'मुंडे अन् गँग औरंगजेबापेक्षाही क्रूर'; करुणा मुंडेंचे गंभीर आरोप, पाहा स्पेशल रिपोर्ट

Karuna Munde Latest news : राज्यात औरंगजेबावरुन राजकारण तापलंय...मात्र आता करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची औरंगजेबाशी तुलना केलीय.. त्याचं कारण नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Tanmay Tillu

काही दिवसांपासून राज्यात औरंगजेब,कबर आणि त्यावरुन होणाऱ्या वादांमुळे राज्याचं वातावरण गढूळ झालं होतं. मात्र आता पुन्हा राज्यातील बड्या नेत्याची तुलना औरंगजेबाशी करण्यात आलीये. थेट करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर कठोर शब्दात टीका करत मुंडे हे औरंगजेबापेक्षाही क्रूर वृत्तीचे असल्याचं म्हटलंय.औरंगजेबानं आपल्या बायका-पोरांचे कधीही हाल केले नाहीत, असं म्हणत करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबाबतच्या खटल्यात महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयानं कायम ठेवलाय..

धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधील संबंध लग्नासारखे

2 मुलांना जन्म देणं एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही

करुणा मुंडे कायद्यांतर्गत दिलासा मिळवण्यास पात्र

करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखी जीवनशैली मिळायला हवी

करुणा शर्मांच्या या गंभीर आरोपांनी खळबळ माजलीये. तर दुसरीकडे येत्या काळात आणखी गोष्टी बाहेर काढणार असल्याचही करुणा म्हणतायत.. यामध्ये फक्त धनंजय मुंडे नाहीत इतरही लोक आहेत त्या सगळ्यांना शिक्षा होणार असल्याचा विश्वास करुणा शर्मांनी व्यक्त केलाय.त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार का आणि यामुळे मुंडे आणि गँग या विरोधकांच्या आरोपांना पुष्टी मिळणार का हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT