Hardik patel And kanhaiya kumar Saam Tv
मुंबई/पुणे

'दोस्त दोस्त ना रहा'; हार्दिक पटेलांच्या भाजप प्रवेशावर कन्हैय्या कुमारांची प्रतिक्रिया

पाटीदार समाजाचा बडा नेता म्हणून हार्दिक यांची ओळख आहे. मात्र, हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काँग्रेसनेते कन्हैय्या कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel ) यांनी भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधीच हार्दिक यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पाटीदार समाजाचा बडा नेता म्हणून हार्दिक यांची ओळख आहे. मात्र, हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काँग्रेस (Congress) नेते कन्हैय्या कुमार (kanhaiya kumar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'दोस्त दोस्त ना रहा' अशा शब्दात कन्हैय्या कुमार यांनी हार्दिक पटेल यांच्यावर टीका केली आहे. ( kanhaiya kumar News In Marathi )

हे देखील पाहा -

पुण्यात आज आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या पुढाकाराने कनेक्ट महाराष्ट्र कॅानक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात कन्हैय्या कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात कन्हैय्या कुमार यांनी हार्दिक पटेल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कन्हैय्या कुमार म्हणाले, 'मी हिंदी सिनेमातील गाणं गाणार नाही. पण 'दोस्त दोस्त ना रहा' एवढं तर नक्की बोलेल. व्यक्तीच्या चेहऱ्यावर कधी जायचं नसतं'.

कन्हैय्या कुमार पुढे म्हणाले, 'वय निघून जातं. पण विचार नाही. विचार कधीही मरत नाही. हार्दिक पटेल जेव्हा भाजपच्या विरोधात होते, तेव्हा प्रभावशाली युवा नेते होते. आता हार्दिक केवळ भाजपचे नेता म्हणून राहतील'. 'स्वातंत्र्य भारतात स्वातंत्र्यावर बोलणं काही चुकीचं नाही. काही लोक स्वातंत्र्यावर बोलतात, पण काही लोक फक्त मोदी मोदी बोलतात',असंही कन्हैय्या कुमार म्हणाले.

'द्वेषाची शेती करणाऱ्यांना सांगू इच्छितो की, राधा ही कृष्णाची बायको नव्हती, तर प्रियसी होती. हा देश कायम प्रेम साजरं करत आला आहे. देशाचा विकास २०१४ च्या आधी सुद्धा झाला आहे. वर्तमान काळातील लोक जेव्हा जमिनीवर लोळण घेऊन हाजी हाजी करत आहेत, तेव्हा महाराष्ट्रातल्या युवकांनी पेटून उठायला हवं, असंही कन्हैय्या कुमार यांनी सांगितले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

CMF Headphones Pro: 100 तास प्लेबॅकसह नवीन CMF वायरलेस हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर उजडला, लाडकीला सप्टेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT