Kalyan News  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले 'मेलोडी' चॉकलेट

Kalyan News : कल्याणमध्ये युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन केलं. पेट्रोल पंपावर ग्राहकांना 'मेलोडी' चॉकलेट वाटले. या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन करण्यात आलं

इंधन दरवाढी विरोधात मेलोडी चॉकलेट

वाटप करत केले निषेध आंदोलन

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Kalyan : वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसने रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशात रॉकेटच्या वेगाने महागाई वाढत असताना मोदी सरकार मात्र गप्प आहे,असा आरोप केला.

विदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना मेलोडी चॉकलेट देतात, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आज पेट्रोल भरताना सामान्य माणूस आधी आपल्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे पाहतो.

इंधन दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच मोदी सरकार वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देते, पण पेट्रोल भरून रोज काम करणारा सामान्य कामगार, शेतकरी किंवा मजूर वर्क फ्रॉम होम कसा करणार? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

कल्याण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग माटा यांनी सांगितले की, २०१४ पासून महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांचे जीवन कडू झाले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आम्ही हे मेलोडी चॉकलेट आंदोलन करत निषेध नोंदवत आहोत. या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा रंगली असून युवक काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT