kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

kalyan Crime : सासरा आणि दिराकडून विवाहितेवर सामूहिक अत्याचार, नवऱ्याकडून मारहाण; कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan News: कल्याणमध्ये एका विवाहितेवर तिच्याच सासरा आणि दिराकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Satish Kengar

अभिजित देशमुख, साम टिव्ही, प्रतिनिधी

कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण ग्रामीण भागात टिटवाळा परिसरात एका महिलेवर तिच्याच सासरे आणि दिराने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घरात कुणी नसताना विवाहितेवर तिचा सासरा, दीर आणि अल्पवयीन नातेवाईकाने सामूहिक अत्याचार केला आहे. आपल्यासोबत घडलेली घटना पीडितेने आपल्या पतीला सांगितली. मात्र पतीने तिच्यावरच संशय घेत तिला दगड विटांनी मारहाण केली. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी पीडित महिलेचा सासरा, दिराला बेड्या ठोकल्यात आहेत, तर अल्पवयीन नातेवाईकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीणमधील टिटवाळा परिसरात ही घटना घडली. पीडित विवाहित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर तिचा सासरा, दीर आणि एका अल्पवयीन नातेवाईकाने सामूहिक अत्याचार केला.

घडल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितलं. मात्र पतीने तिचे काही ऐकू न घेता तिच्यावर संशय घेत तिला दगड विटांनी मारहाण केली.

या मारहाणीत पीडित महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सासरा, दीर, अल्पवयीन नातेवाईकासह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सासरा, दिराला अटक केली आहे. तसेच अल्पवयीन नातेवाईकाला देखील ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT