Kalyan West Tragedy Saam tv news
मुंबई/पुणे

Kalyan: इमारतीची लिफ्ट ६व्या मजल्यावरून खाली कोसळली, ८ जणांपैकी चौघे जखमी, दोघांचा पाय फ्रॅक्चर

Kalyan West Tragedy: कल्याण पश्चिमेतील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून कोसळली. लिफ्टमध्ये ८ जण होते, त्यापैकी ४ जण गंभीर जखमी, २ जणांचे पाय फ्रॅक्चर.

Bhagyashree Kamble

  • कल्याण पश्चिमेतील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून कोसळली.

  • लिफ्टमध्ये ८ जण होते, त्यापैकी ४ जण गंभीर जखमी, २ जणांचे पाय फ्रॅक्चर.

  • नादुरुस्त लिफ्ट सुरू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप.

  • महापालिका अधिकारी आणि लिफ्ट मेंटेनन्स कंपनीवर रहिवाशांचा संताप.

कल्याण पश्चिममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गांधारी परिसरातील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये एकूण ८ जण प्रवास करीत असल्याची माहिती आहे. त्यापैकी चार जण गंभीर जखमी असून, दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मेस्त्री यांच्या घरी गणेश दर्शनासाठी काही जण आले असताना हा अपघात घडला. गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट मेंटेनेसमध्ये असल्याचे इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे आहे. तरी देखील नादुरूस्त लिफ्ट सुरू ठेवण्यात आली होती.

इमारतीला दोन लिफ्ट असताना, अशा बिघडलेल्या लिफ्टचा वापर करून रहिवाशांच्या जीवाशी खेळ का करण्यात आला, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते. त्यापैकी ४ जण जखमी, तर २ जणांचा पाय मोडल्यानं गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, नादुरूस्त लिफ्ट सुरू ठेवण्यात आल्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला. लिफ्ट मेंटेनन्स आणि फायर लाईन सुरक्षेकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT