Kalyan Traffic jam News  AI Image
मुंबई/पुणे

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Kalyan Traffic Update News : कल्याणमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे. नो पार्किंग झोन, वाहतूक वळवणी, पर्यायी मार्ग आणि जड वाहनांसह बसेसवरील निर्बंधांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी विशेष वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू

  • प्रमुख मिरवणूक मार्गांवर नो पार्किंग झोन लागू

  • वाडेघर चौक, आधारवाडी चौक आणि गोविंदवाडी बायपाससह विविध पर्यायी मार्ग निश्चित

  • मिरवणूक मार्गांवर वाहने पार्क न करण्याचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी कल्याण वाहतूक उपविभागाकडून विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रमुख मिरवणूक मार्गांवर नो पार्किंग झोन लागू करण्यात आला असून, काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकांच्या काळात नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. कोनगावकडून दुर्गाडीमार्गे कल्याण शहराच्या दिशेने येणारी हलकी वाहने वाडेघर चौक आणि आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. दरम्यान, कोळशेवाडीहून कोनगावच्या दिशेने जाणारी हलकी वाहने गोविंदवाडी बायपासमार्गे वळवण्यात येणार आहेत. तसेच कोनगावच्या बाजूने डोंबिवली, मानपाडा, कल्याण फाटा आणि शिळफाटा या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी चौकातून वळवून दुर्गाडी-गोविंदवाडी बायपासमार्गे पुढे पाठवण्यात येणार आहे.

कोनगाव गणेश घाट आणि दुर्गाडी गणेश घाट परिसरात विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास वाहनचालकांसाठी गांधारी पूल हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड-अवजड वाहने तसेच सार्वजनिक आणि खासगी बसेसच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. तसेच मुख्य मिरवणूक मार्गांवर वाहने पार्क न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन कल्याण वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT