Kalyan Politics : Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Politics : विधानसभेआधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : विधानसभा निवडणूका जवळ येऊन ठेपल्या असतानाच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यामध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळत आहे. 'पक्षातील नेत्यांमधील गटबाजीमुळे निष्ठावंत शिवसैनिक भरडला जातोय, त्यामुळे ही गटबाजी लवकर दूर करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पत्रातून ठाकरेंना केली आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे .

विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत चार विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर या मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू असल्याने या संधीचा फायदा उचलण्यासाठी ठाकरे गट सरसावला आहे. ठाकरे गटाकडून देखील या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं आहे?

या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे. मात्र ठाकरे गटातील सुरु असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील सात विभाग प्रमुखांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात कशा प्रकारे पक्षात गटबाजी सुरु आहे. पक्षातील वरिष्ठ नेते एकमेकांविरोधात गटबाजी करत आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक भरडला जात आहे. या गटबाजीचा फटका विधानसभा निवडणूकीत बसू शकतो. विधानसभा मतदारसंघामधील विभाग प्रमुखांना विश्वात न घेता निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही गटबाजी संपवा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची शिंदे गटावर टीका

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. 'राजकीय लढाई संजय राऊत लढत आहेत. घाबरलेले आणि बिथरलेले लोक हे त्यांना अटक करण्याच्या मागे लागले आहे. त्यांना माहिती आहे की, संजय राऊत हे लढाई लढताहेत, ती लढाई लढण्याची हिंमत या गिधाडांमध्ये नव्हती. त्यामुळे पक्ष सोडून गेले, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांनी शिंदे गटावर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Entertainment News: प्रसिद्ध अभिनेत्रीला उल्हासनगर पोलिसांकडून अटक; कारण वाचून बसेल धक्का

Maharashtra News Live Updates :मी आधुनिक अभिमन्यु, मला चक्रव्यूह तोडता येतं, मी ते तोडून दाखवणार - देवेंद्र फडणवीस

BIS Recruitment: सरकारी नोकरी आणि महिना १,४२,००० रुपये पगार; कुठे निघाली भरती? जाणून घ्या पात्रता आणि अटी

Pune Porsche Accident: ‘पोर्शे' अपघातातील अल्पवयीन मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना; दिल्लीतील संस्थेने ॲडमिशन रद्द केलं

Chai Wala Viral Video: चहावाल्या आप्पाचा विषय हार्ड, दुकानदारीसाठी लढवली जबरदस्त शक्कल; सर्वत्र होत आहे कौतुक

SCROLL FOR NEXT