संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही
कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या मुलानं राहत्या घरात आयुष्य संपवलं होतं. लोकलमध्ये झालेल्या हिंदी - मराठी भाषिक वादावरून त्यानं आयुष्य संपवलं असल्याची माहिती आहे. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणाचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. अर्णवचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, डिजिटल पुरावे शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मोबाईलचा पासवर्ड उपलब्ध नसल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फोन डेटा उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अर्णव खैरेला मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून रेल्वेत अज्ञात प्रवाशांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मानसिक धक्क्यातून अर्णवने घरी परतल्यानंतर आत्महत्या केल्याने संपूर्ण कल्याण परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. GRP, RPF यांच्यासह स्थानिक पोलिसांच्या दोन विशेष पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. अर्णवने प्रवास केलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या हालचालींची चौकशी वेगाने सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १० ते १५ प्रवाशांची ओळख पटवण्याचे प्रयत्न कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहेत.
अर्णवच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या हालचाली, मोबाईलमधील माहिती, प्रसंगातील प्रत्यक्षदर्शी प्रवासी यांची एकत्रित तपासणी करून त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण शोधण्याकडे पोलिसांचा कल आहे. कल्याण झोन-3 चे वरिष्ठ अधिकारी स्वतः या तपासावर लक्ष ठेवून असून सर्व शक्य कोनातून सखोल चौकशी सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.