Kalyan station traffic news Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Station : कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीत बदल; कुठे प्रवासाला बंदी? पर्यायी मार्ग कोणते? वाचा..

Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्याचा वाहतूक विभागाने निर्णय घेतला आहे. परिसरात कोणत्या मार्गांवर बंदी असणार आहे आणि कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे, ते वाचा..

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे पुलाचे काम सुरु आहे. पुलावर गर्डन बसवण्यात येणार असल्याने रेल्वे पुलाच्या कामात अडथळा येऊ नये. त्यासोबत परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्टेशन परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाद्वारे घेण्यात आला आहे.

पुनर्विकासाच्या कामामुळे कल्याण स्टेशन परिसरात एसटी महामंडळ, केडीएम, एनएमएमटीच्या बसेस वगळता अन्य सर्व खासगी बस आणि खाजगी जड अवघड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. एसटी, केडीएम, एनएमएमटीच्या बसेसना कल्याण स्टेशनपर्यंतचा प्रवास पर्यायी मार्गाने करावा लागणार आहे.

कल्याण-डोबिंवली स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरातील पुनर्विकासाचे काम सुरु आहे. यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक, एसटी स्टँड या दरम्यान सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

रेल्वे पुलाच्या कामामुळे कल्याण स्टेशन परिसरात खासगी बससह सर्व जड-अवजड वाहनांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांना प्रेम ऑटो-खडकपाडा-आधारवाडी-दुर्गाडी चौक-गोविंदवाडी बायपास-पत्री पूल-बैल बाजार-गुरुदेव हॉटेल मार्गे प्रवास करावा लागणार आहे. यासंबंधित माहिती कल्याण वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हाल

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT