Kalyan Bridge Work Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Smart City: कल्याणमध्ये स्मार्ट सिटीच्या कामाला वेग; वाहतूक व्यवस्थेत करण्यात आले मोठे बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kalyan Bridge Work: कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल व एसटी आगाराच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे. या विकास कामाला गती देण्यासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा रस्ता रहदारीकरीता बंद करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Traffic News:

कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल व एसटी आगाराच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे. या विकास कामाला गती देण्यासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा रस्ता रहदारीकरीता बंद करण्यात येणार आहे. तसेच काही मार्गावर एकेरी वाहतूक करुन काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यांची अंमलबजावणी येत्या चार दिवसात केली जाणार असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वल्लीपीर चौक ते महात्मा फुले चौका दरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. तसेच एसटी डेपोच्या इमारतीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याठिकाणी मल्टी मॉडेल पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. हे काम मार्गी लावण्याकरीता नागरीकांच्या सोयीसाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुष्कराज हॉटेल मोहमद अली चौक ते दिपक हॉटेल दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. वाहनांनी दिपक हॉटेलला येवून पुष्कराज हॉटेल, मोहमद अली चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिपक हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही वाहने दिपक हॉटेल एसटी स्टॅन्ड इनगेट ते गुरुदेव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. महात्मा फुले चौक कडून पुष्कराज हॉटेल मोहम्मद अली चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना महात्मा फुले मौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सर्व वाहने महात्मा फुले चौक दिपक हॉटेल एसटी स्टैंड इनगेट ते गुरुदेव हरित मार्गे इछित स्थळी जातील. (Latest Marathi News)

एसटी स्टॅन्ड इनगेट ते झुंजारराव मार्केट से गुरुदेव हॉटेल दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. गुरूदेव हॉटेलकडून कल्याण स्टेशनकडे व झुंजारराव मार्केटकडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना गुरूदेव हॉटेल येथे 'प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने गुरुदेव हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज यौक पुष्कराज हॉटेल मोहम्मद अली चौक मार्गे मार्गे इच्छित स्थळी जातील. अथवा झुंजारराव मार्केट येथे जाणारी वाहने डी मार्ट आर्चिज गॅलरीगल्ली मार्गे इच्छीत स्थळी जातील.

आर्चिज गॅलरी - साधना हटिल नाना नानी पार्क मागील बाजू ते टेनिस कोर्ट केडीएमसी दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. टेनिस कोर्टकडून साधना हॉटेलकडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना टेनिस कोर्ट येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

सर्व वाहने कराची मेडिकल आर्चिज गॅलरी वल्लीपीर मार्गे इच्छित स्थळी जातील. महात्मा फुले चौक ते दिपक हॉटेल हा एक दिशा मार्ग रद्द करून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना सुभाष चौक येशून कल्याण स्टेशनकडे जाण्यासाठी सुभाष चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे कल्याण स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी बसेराना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

सुभाष चौक पेजून कल्याण स्टेशनकडे जाणारी जड अवजड वाहने हो प्रेम ऑटो सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जातील. तसेच सर्व खाजगी बसेस महात्मा फुले चौक येथे यु टर्न घेवून सुभाष चौक मार्गे इ्च्छीत स्थळी जातील. वाहतूक अधिसूचना वल्लीपीर चौक ते महात्मा फुले चौक दरम्यान उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर,ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT