Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणहून पुणे, नगरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अपटेड; शहाड उड्डाण पूल इतके दिवस राहणार बंद, कारण काय?

Kalyan Shahad Bridge : आज पासून १५ ऑक्टोबरपर्यंत शहाड उड्डाण पूल दुरुस्तीकरिता सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. कल्याण – मुरबाड, नगरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

Alisha Khedekar

  • शहाड उड्डाण पूल १८ दिवस सर्व वाहनांसाठी बंद राहणार.

  • पुल दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निर्णय घेतला आहे.

  • कल्याण – मुरबाड, नगरकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित.

  • पोलिसांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं.

कल्याण – मुरबाड, नगर, जुन्नरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहाड उड्डाण पुल २८ सप्टेंबर मध्य रात्री पासून १५ ऑक्टोबरपर्यंत शहाड पूल सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. पुलाची दुरुस्ती करण्यासाठी हा पूल बंद करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यासाठी वाहतूक विभागाने अधिसूचना काढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाड उड्डाण पुलावर तब्बल १८ दिवस गाड्या धावणार नाही. पावसात खड्ड्यांनी विदारलेल्या पुलाच्या सांध्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे मोठे काम सुरू होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. २८ सप्टेंबर मध्य रात्री पासून १५ ऑक्टोबरपर्यंत शहाड पूल सर्व वाहनांसाठी बंद राहणार असून, या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना काढली आहे. तसेच वाहनचालकांनी पुलावर अजिबात गर्दी करू नये आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शिरसाट यांनी केले आहे. तर कल्याणकरांनो, पुढील पंधरा दिवस शहाड पूल टाळाच! नाहीतर वाहतुकीच्या कोंडीत अडकणार हे नक्की.

कोणत्या वाहनांवर परिणाम?

कल्याण – मुरबाडमार्गे माळशेज घाट, जुन्नर, नगरकडे जाणारी वाहतूक प्रभावित होणार आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ, मुरबाड हद्दीतील नोकरदार, व्यावसायिक, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे भाजीपाला, फळे घेऊन येणारी वाहने यांना मोठा फटका बसणार आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गावर सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते १० प्रवेश बंदी असणार आहे. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवा वाहने मात्र मोकळी राहणार आहेत.

पर्यायी मार्गांची आखणी

  1. मुरबाड – माळशेज घाटाहून येणाऱ्या वाहनांना बारवी डॅम फाटा येथे प्रवेश बंद राहणार आहे. तर प्रवाशांना बदलापूरहुन पत्रीपूला जाण्यासाठी पालेगावमार्गी नेवाळी नाका पुढे मलंगगड रस्ता मार्गी लोढा, पलावा/शीळ डायघर/पत्रीपूल मार्गे पुढे प्रवास करावा लागणार आहे.

  2. मुरबाड तालुक्यातून शहाड पुलाकडे येणाऱ्या वाहनांना दहागाव फाटा (रायता गाव) येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रायता गावहून वाहोली, मांजर्ली मार्गी बदलापूरहुन पालेगाव आणि नेवाळी नाका पार करत पत्रीपूल मार्गे पुढे प्रवास करावा लागणार आहे.

  3. कल्याण, भिवंडी, ठाणेकडून मुरबाडकडे जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी पूल येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या प्रवाशांना दुर्गाडी पूलहुन गोविंदवाडी वळण घेत पत्रीपूल ते चक्कीनाका आणि पुढे नेवाळी नाका, पालेगाव पार करत बदलापूर मार्गे मुरबाडकडे प्रवास करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT