kalyan Saptashrungi Building Collapsed Saam Tv News
मुंबई/पुणे

Saptashrungi Building Collapsed : माहेरी दोन दिवस आली, लेकीवर काळाची झडप, स्लॅब कोसळून चिमुकली ठार; आईने फोडला हंबरडा

kalyan Saptashrungi Building Collapsed : नमस्वी शेलार असं या मृत मुलीचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर येथील उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Prashant Patil

ठाणे : कल्याणच्या चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीच्या दुर्घटनेनं अनेक कुटुबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत निष्पाप ६ जणांचा मृत्यू झाला असून दोन वर्षांच्या चिमुकलीनेही आपला जीव गमावला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एक दिवस अगोदरच ती चिमुकली तिच्या आईसह मामाच्या गावी आली होती. मात्र, तोच दिवस काळ बनून जीवावर उठला. नमस्वी शेलार असं या मृत मुलीचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर येथील उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर, आपल्या चिमुकलीचा मृतदेह हाती घेऊन आईनं हंबरडा फोडला, हे काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं.

सप्तशृंगी इमारतीच्या तळमजल्यावर जयश्री गुजर घरात किचनमध्ये काम करत होत्या. याच दरम्यान दुपारच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. मोठ्ठा आवाज झाल्याने जयश्री बाहेर आल्या तर भला मोठा स्लॅब कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, काही क्षणातच सगळीकडे मोठी धूळ पसरली. या धक्क्यातून सावरतेच तोच आपली आजी, आत्या, ४ वर्षांचा भाचा, दोन वर्षांची भाची ढीगाऱ्याखाली असल्याचं जयश्रीच्या लक्षात आलं. आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. याचदरम्यान अग्निशमन विभागानं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. या दुर्घटनेत जयश्री बचावली तरी तिची आजी सुशीला शेलार, दीड वर्षाची भाची नमस्वी शेलार यांचा मृत्यू झाला. तर, तिची आत्या अरुणा विरणारायन आणि भाचा श्रविल शेलार जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लेक आईला भेटण्यासाठी नाशिकच्या सिन्नरवरून कल्याणला घटनेच्या एक दिवस अगोदर आली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाची तयारी सुरू होती, नात जयश्री किचनमध्ये जेवणाचं नियोजन करत होती, तर हॉलमध्ये माय-लेकी गप्पा मारत होत्या. चिमुकलं लहान मुलं दुपारच्या झोपेत होतं, त्यातच अचानक मोठा आवाज झाला आणि डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालं. या दुर्घटनेत झोपेत असलेली लहान मुलगी ढिगाऱ्यात अडकून पडली, बचाव कार्यादरम्यान दोघांना वाचवण्यात यश आलं पण दोन वर्षांच्या चिमुकलीचे झोपेत असतानाच निधन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT