kalyan News saam tv
मुंबई/पुणे

kalyan News: प्रेमसंबंधाच्या आड आलं कुटुंब, तरुणाने रेल्वे सिग्नलला लटकून संपवलं जीवन

Railway News: प्रेमसंबंधाच्या आड आलं कुटुंब, तरुणाने रेल्वे सिग्नलला लटकून संपवलं जीवन

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Klayan News: कल्याण रेल्वे स्टेशन ते शहाड रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या लोको शेड परिसरात रेल्वे सिग्नलला लटकून एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घडण घडली आहे. विकास काटे असं या तरुणाचं नाव असून त्याचे एका मुलीशी प्रेमप्रकरण होते.

मात्र मुलीच्या कुटुंबियांनी प्रेमसंबंधास विरोध केल्याने विकास तणावात होता. प्रेमसंबंधास विरोध असल्याने विकास याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळ असलेल्या रेल्वे लोकोशेड परिसरात रेल्वेच्या सिग्नला एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती मंगळवारी रात्री पोलिसाना मिळाली. कल्याण रेल्वे पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शव विच्छेदनाकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला. (Latest Marathi News)

विकास काटे असे या मयत तरुणाचे नाव होते. कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला असता माहिती मिळाली की, विकास हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात राहतो. तो सहा दिवसापासून घरातून बेपत्ता होता. घरच्या लोकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

पोलिसांनी सांगितले की, विकास हा एका मुलीच्या प्रेमात होता. मात्र मुलीच्या घराच्या मंडळीचा त्याला विरोध होता. त्यामुळे तो मानसिकदृष्टया खचला होता. त्यातून त्याने आपलं जीवन संपवल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण येवला पोलिस ठाण्यास वर्ग केले जाणार आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT