kalyan railway station update : Saam tv
मुंबई/पुणे

kalyan railway station : कल्याण रेल्वे स्टेशनने थकवलंय पाणी बिलाचे ४ कोटी; KDMCकडून कनेक्शन कट

kalyan railway station update : कल्याण रेल्वे स्टेशनने पाणी बिलाचे ४ कोटी हून अधिक थकवल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर कल्याण महापालिकेने पाण्याचे कनेक्शन कट केलं.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण रेल्वे स्टेशनची पाणी बिल थकबाकी चार कोटी 41 लाखांची थकबाकी असल्याने केडीएमसीने कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. केडीएमसीकडून रेल्वे प्रशासनाला थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी वारंवार नोटीस, अल्टिमेटम दिले. मात्र त्यानंतरही रेल्वेने थकीत रकमेचा भरणा न केल्याने केडीएमसीने आज सकाळी कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.

मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांवर केडीएमसीने कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या कचाट्यात आता कल्याण रेल्वे स्टेशन देखील सापडलं आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या पाणी बिलापोटी यंदाच्या वर्षी सुमारे एक कोटी तसेच मागच्या वर्षीचे तीन कोटी असे मिळून चार कोटी 41 लाखाची थकबाकी होती.

अभय योजनेअंतर्गत त्यांचे 31 लाख रुपये माफ करण्यात आले. मात्र उर्वरित थकबाकी भरण्यासाठी केडीएमसीने रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवल्या होत्या. 24 तासांचा अल्टिमेटम देखील दिला होता. मात्र रेल्वे प्रशासनाकडून थकीत रकमेचा भरणा न केल्याने अखेर केडीएमसीने कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर पाण्याचे समस्या उद्भवली आहे.

केडीएमसीच्या शाळांमधून सौरउर्जा निर्मिती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विद्युत विभागाकडून केडीएमसी शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पाथर्लीमधील आचार्य भिसे गुरुजी ही 62 क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते या शाळेतील सौरउर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT