Car Stunt in Kalyan : Saam tv
मुंबई/पुणे

Car Stunt in Kalyan : धक्कादायक! धावत्या कारवर बसून तरुणाची स्टंटबाजी, अल्पवयीन मुलगा चालवता होता गाडी; पोलिसांकडून कारवाई

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये भररस्त्यात धावत्या कारवर बसून तरुणाने स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या प्रकारानंतर पोलिसांनी कारवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी स्टंटबाज करणारा तरुण आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाच्या प्रतापाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याचदरम्यान, ही घटना समोर आली आहे.

कल्याणमध्ये भररस्त्यात कारवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचं नाव शुभम मितालिया असं आहे. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांची होती. आज शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा प्रताप तरुणाने केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोर त्याने प्रताप केल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणाच्या स्टंटबाजीमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला. कार अल्पवयीन मुलगा चालवता होता. तर या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरून बसला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'कारच्या बोनेटवर बसून तरुण स्टंट करत आहे. ती कार रस्त्यावर धावत आहे. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी स्टंटबाज तरुणाचा शोध घेतला. पोलिसांनी कारच्या नंबरवरून स्टंटबाज करणाऱ्या शुभम मितालिया शोध घेतला.

शुभम कारच्या बोनेटवर बसला होता. तर कारचं स्टेअरिंग अल्पवयीन मुलाच्या हातात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी शुभम मितालियासह अल्पयवीन कारचालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT