Kalyan Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Kalyan News: पुण्यानंतर कल्याणमध्ये 'खाकी पॅटर्न', गुन्हेगारांची भरस्त्यात धिंड

Khaki Pattern Action: काही दिवसांपासून कल्याण पुर्वेतील कोळसेवाडी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली होती. यावर गुन्हेगारांवर योग्य कारवाई करत, पोलिसांनी त्यांची भररस्त्यात धिंड काढली आहे.

Bhagyashree Kamble

कल्याण शहर काही दिवसांपासून गुन्हेगारांमुळे चर्चेत आहे. विशााल गवळीने केलेली अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या. या प्रकणामुळे संपूर्ण राज्य तापलं होतं. अशातच पुण्यानंतर आता कल्याणमध्ये देखील पोलिसांचा खाकी पॅटर्न पाहायला मिळाले आहे. कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हेगारांना एक वेगळीच शिक्षा दिली आहे.

कल्याणमध्ये सध्या पोलीस पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली असून, याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसांनी आरोपींना बांधून रस्त्यावरून धिंड काढली आहे. कल्याणमध्ये पोलिसांचं खाकी पॅटर्न पाहून नागरीकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.

कल्याणमध्ये गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ जरी झाली असली, तरी पोलिसांनी कायम अॅक्शन मोडमध्ये येत योग्य ती कारवाई केली आहे. काही दिवसांपासून कल्याण पुर्वेतील कोळसेवाडी परिसरात चार गुन्हेगारांची दहशत वाढली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारांनी नागरीकांमध्ये दहशत माजवली होती. मात्र, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांची चारचौघात धिंड काढली आहे.

रामराव तामंड उर्फ पिंट्या, कृष्णा माळी, प्रतीक माळी, सुमित केदारे अशी चार गुन्हेगारांची नावे असून, त्यांनी काही महिन्यांपासून कल्याण पूर्व परिसरात दहशत माजवली होती. मात्र, पोलिसांनी योग्य कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांची भर रस्त्यात धिंड काढली आहे. पुण्यानंतर कल्याणमध्ये खाकी पॅटर्न दिसल्यामुळे नागरीकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT