Kalyan Police News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Police News: दारू सोडा.. दूध प्या, दररोज इतके होतात अपघात? कल्याण पोलिसांनी वेधलं लक्ष

Kalyan Police News: रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अनोखे अभियान राबवले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अनेकदा वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याचं प्रमाण अधिक आहे.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख

Kalyan Police News

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अनोखे अभियान राबवले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अनेकदा वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांनी मद्यप्राशन करून गाडी चालवू नये यासाठी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण दुर्गाडी चौकात वाहन चालकांना दूध वाटप करत अनोखा उपक्रम राबवला. यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना दारू सोडा दूध प्या असं आवाहन केलं. कल्याण पोलिसांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाची कल्याण परिसरात चर्चा सुरू आहे.

अलिकडे मद्यपान करणाऱ्यांचं प्रमाण खूपचं वाढलं आहे. त्यामुळे अपघाताच प्रमाणदेखील वाढलं आहे. यात अनेक निष्पाप लोकांचा बळी जोता, कायमच अपगंत्व येतं. दवाखान्याचा खर्च यामुळे आर्थिक संकट येतं. त्यामुळे मद्यपान करून वाहने चालवू नये वाहतुकीचा नियम आहे. यासाठी कडक कायदे देखील आहेत. कठोर कारवाई केली जाते. तरी देखील मद्यपान करून वाहने चालवली जातात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने प्रसिद्ध केलेल्या रस्ते सुरक्षेवरील ताज्या जागतिक अहवालानुसार, २०२१ मध्ये जगभरातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येक १०० पैकी तेरा जण हे भारतातील होते. भारतात रस्ते अपघातात 2010 मध्ये 1.34 लाख मृत्यूंची नोंद झाली होती ती 2021 मध्ये 1.54 लाखांवर पोहोचली आहे. तर २०२२ मध्ये सर्वाधिक म्हणजे १.६८ लाख लोकांनी रस्त्यावर आपला जीव गमावला आहे. दक्षिण-पूर्व आशियात 3.3 लाख लोकांपैकी जवळजवळ 46% लोकांचा मृत्यू झाला होता. शिवाय रस्त्यावरील मृत्यूंमध्ये भारत 174 देशांमध्ये अव्वल स्थानावर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

342,202 किलोमीटरच्या रस्त्यांवरील बहुतेक अपघात हे वाहनचालकांच्या विविध वर्तणुकीशी संबंधित जोखमींमुळे झाले आहेत. वाहन वेगात चालणे, मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीचे किंवा हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न वापरणे अशा मोठ्या चुकांमुळे सर्वाधिक अपघात झाल्याची या आहवालात नोंद झाली आहे. यात मद्यपान करून झालेल्या अपघातांची संख्य़ा लक्षणिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT