मुंबई/पुणे

Reel Star Prem Bhati Accident: सुप्रसिद्ध रीलस्टारच्या दुचाकीचा अपघात, प्रेम भाटीचा उपचारादरम्यान मृत्यू

Reel Star Prem Bhati Died: कल्याणमध्ये एका दुचाकी अपघातात लोकप्रिय 'रील स्टार' प्रेम भाटी याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रस्ते सुरक्षा आणि निष्काळजीपणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Bharat Jadhav

  • लोकप्रिय रीलस्टार प्रेम भाटी याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

  • पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मोहने परिसरात हा अपघात घडला.

  • रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण परिसरातील लोकप्रिय रीलस्टार प्रेम भाटी यांच्या दुचाकीचा शनिवारी पहाटे अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे, या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये तसेच कल्याण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेम भाटी हा शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मोहने परिसरातून दुचाकीवरून आपल्या घरी जात होता.

यावेळी रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांच्या दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला तो रस्त्यावर पडला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेबाबत रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ते दुरुस्ती व देखभालीतील हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रेम भाटी सोशल मीडियावर त्याच्या रील्समुळे लोकप्रिय झाला होता. त्याच्या अकाली निधनामुळे चाहत्यांसह मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, घटनास्थळाचे अन्य पुरावे तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

Maharashtra News Live Update: हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूल गेला वाहून

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

SCROLL FOR NEXT