Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan: शिवसेनेच्या राजकीय देखाव्याला पोलिसांचा विरोध; देखाव्याचं साामानही केलं जप्त

कल्याण मधील 'त्या' देखाव्यावर पोलिसांची कारवाई...

प्रदीप भणगे

मुंबई - कल्याण मधील विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील (Shivsena) राजकीय घडामोडींवर देखावा साकारला होता. पक्ष निष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. मी शिवसेना बोलतेय इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात आली आहे. या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा आहे. मात्र याला कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला असून या देखाव्यावर आज पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामग्री जप्त केली.

तर या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वर्षातील महत्वाच्या घडामोडीवर देखावा साकारला जातो. यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हत ,पहाटेच्या सुमारास कारवाई केली, ही हिटलरशही आहे.आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे सांगितले साळवी यांनी सांगितले.

हे देखील पाहा -

कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळ हे 59 वर्षाचे आहे. 59 वर्षापासून या मंडळाकडून गणेश उत्सव साजरा केला जात आहे.दरवर्षी या मंडळाकडून ताज्या घडामोडींवर आधारित देखावा साकारला जातो. यंदा शिवसेनेतील फूट हा ताजा विषय असल्याने या विषयावर देखावा साकारण्यात आला होता. पक्षनिष्ठा हा या देखाव्याचा विषय होता, मात्र पोलिसांनी या देखाव्याला आक्षेप घेत हा देखावा जप्त केला आहे.

पहाटेच्या सुमारास पोलीस ताफा आला आणि मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तयार करण्यात आलेले देखावा ही जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की ही एक प्रकारे हिटलरशाही आहे, तिचा आम्ही निषेध करतो. मंडळाने काहीही वादग्रस्त दाखवले नव्हते, तर ताज्या विषयावर भाष्य केले होते. तरी देखील देखावा जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT