Kalyan Hookah Parlous Video Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: पुण्यानंतर कल्याण बनतेय 'उडता पंजाब', ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर सुरू

Kalyan Hookah Parlous Video: कल्याणमध्ये ढाब्यांच्या नावाखाली हुक्का पार्लर सूरू आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कल्याणमधील बिर्ला कॉलेजपासून काही अंतरावरील ढाब्यातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

कल्याणमधून (Kalyan) मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणमध्ये ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर (Hookah Parlours) सुरू आहे. तरुणाई नशेच्या विळख्यात अडकल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटे पाच वाजेपर्यंत हे हुक्का पार्लर सुरू असतात अशी माहिती समोर आली आहे. हुक्का पार्लरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कल्याणमधील बिर्ला कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या हुक्का पार्लरचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रात्रभर कल्याण परिसरातील हे हुक्का पार्लर सुरू असताना देखील पोलिस आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील ड्रग्ज पार्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीर हॉटेल, पब आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र कल्याण-डोंबिवलीत अद्याप कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT