KDMC News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: KDMC तील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, अधिकाऱ्यावर कारवाई करा नाहीतर...; शिवसेनेने दिला इशारा

KDMC News: महिला कर्मचारीचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छडण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आणि प्रभाग कार्यालयातील एका अधिकाऱ्यावर शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या गंभीर आरोपानंतर एकच खळबळ उघडली आहे . पाणीपुरवठा विभागातील या अधिकाऱ्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेवर कोणतेही कारवाई करू नये यासाठी दबाव टाकल्याचा देखील आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सचिव किशोर शेळके यांची भेट घेतली. महिला कर्मचारीचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छडण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोळे काढू, असा इशारा देखील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील शिवसेना पदाधकारी छाया वाघमारे, नितू कोटक आणि नेत्रा उगले यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज केडीएमसी सचिव किशोर शेळके यांची आज भेट घेतली. महिला शिवसेना शिष्टमंडळ केडीएमसी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. आयुक्त इंदूराणी जाखड या बाहेर असल्याने शिष्टमंडळाने सचिव शेळके यांची भेट घेतली. केडीएमसीच्या ब प्रभागातील पाणी पुरवठा खात्यातील अधिकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीने दिला आहे. केडीएमसीतील महिला कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही, शिवसेना महिला आघाडी खंभीरपणे उभी आहे, असे कोणी महिलांसोबत करत असेल तर त्या अधिकाऱ्याचे डोळे काढू, अधिकाऱ्याविरोधात कारवाई झाली नाही तर पुढे काय करु ते बघा, असा इशारा महिला आघाडीने दिला. सचिव शेळके यांनी संबंधित तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. अधिकाऱ्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यांच्याविरोधात लवकर कारवाई केली जाईल असे सचिन शेळके यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT