Kalyan Saam
मुंबई/पुणे

Kalyan: रिक्षावर पठाण लिहिल्यानं वाद, 'इथे का राहतोस, पाकिस्तानला जा' सांगत चालकाला बेदम मारहाण

Pathan Name Rickshaw Assault: रिक्षावर पठाण लिहिल्यावरून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत त्याचे रिक्षाचेही नुकसान केले आहे.

Bhagyashree Kamble

कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रिक्षावर पठाण नाव लिहिल्यावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच इथे का राहतो? पाकिस्तानला जा, असं मारेकरी व्यक्तींनी रिक्षा चालकाला धमकावलं आहे. तसेच रिक्षाचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण शीळ रोडवर एका मु्स्लिम रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रिक्षावर पठाण नाव का लिहिलं? या नावावरून वाद पेटला. रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या रिक्षाचीही तोडफोड करण्यात आली आहे. रिक्षाच्या काचाही फोडल्या आहेत.

चंदन खान असे रिक्षा चालकाचे नाव आहे. मारहाण केल्यानंतर 'इथे का राहतोस, पाकिस्तानला जा', असेही मारहाण करताना अज्ञात व्यक्तीने म्हटलं असल्याचं रिक्षा चालकाने सांगितलं. या प्रकरणानंतर रिक्षा चालकाने थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच मारहाण करणाऱ्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT