Kalyan Marathi Receptionist Case New Video Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाचा नवा व्हिडीओ समोर, थेट पत्रकारांनाच धमकावलं; पाहा Video

Kalyan Marathi Receptionist Case Update : कल्याणमधील मराठी तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा याचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Viral Video: कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या आरोपीचा माज अद्याप उतरलेला नाही. गोकुळ झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज (२५ जुलै) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयात हजर होण्यापूर्वी गोकुळने पोलिसांसमोरच पत्रकारांना धमकी दिली. 'परत तुम्हाला भेटतो' अशी धमकी आरोपीने दिली आहे. तेव्हा पोलिसांची आरेरावी पाहायला मिळाली आहे.

कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका क्लिनिकमध्ये गोकुळ झा याने एका मराठी तरुणीला मारहाण केली होती. ही तरुणी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. या मारहाण प्रकरणानंतर गोकुळ झा फरार झाला होता. स्थानिक नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी गोकुळ झा याला केली. तो शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता. पोलिसांनी गोकुळसह त्याच्या भावाला, रणजीत झा याला देखील अटक केली.

गोकुळ झा दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत होता. त्यानंतर आज त्याला कल्याण सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात हजर होण्यापूर्वी त्याने पत्रकारांना धमकावल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही चुकीचे छापले आहे. तुम्ही चुक केली आहे. लवकरच आपली भेट होईल असे म्हणत गोकुळ झाने पत्रकारांना धमकावले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोकुळ झा याच्यावर मानपाडा येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. या विनंतीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT