Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Local News: पट्टेरी वाघाची कातडी, पिस्तूल तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 42 लाख रुपयांचा ऐवज जप्त

Kalyan Crime News: पट्टेरी वाघ सदृश्य कातडी, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन जणांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

पट्टेरी वाघ सदृश्य कातडी, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन जणांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिताराम नेरपगार आणि ब्रीजलाल पावरा, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

४० लाख रुपयांत या वस्तू ते विकण्यासाठी आले होते. कल्याण न्यायालयाने या दोघांना २७ जानेवारीपर्यंत या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण क्राईमब्रांच युनिट टीमचे पोलिस कर्मचारी दत्ताराम भोसले यांना माहिती मिळाली होती की, डोंबिवलीत पट्टेरी वाघ सदृश्य कातडे, देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकण्यासाठी दोन तस्कर येणार आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी संदीप चव्हाण, पोलिस दत्ताराम भोसले. बाळाराम शिंदे, जितेंद्र नवसारे, अनुप कामत, विनोद चन्ने, विलास कडू या पोलिस पथकाने कल्याण शीळ रस्त्यावरील क्लासीक हॉटेलच्या पार्किंगमध्ये सापळा लावला. दोघांना अटक केली. यामधील सिताराम नेरपगार हा तुळजाभवानीनगर जळगाव येथे राहणारा आहे.

ब्रीजलाल पावरा हा शिवपूर धुळे येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४२ लाखाचा ऐवज हस्तगत केले आहे. त्यामध्ये एका चार चाकी गाडीचा समावेश आहे. या दोघांनी पटेरी वाघ सदृश्य कातडी कुठून आणली. याचा तपास पोलिस करीत आहेत. या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT