Kalyan Durgadi Fort Saam Digital
मुंबई/पुणे

kalyan Durgadi Fort: शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावर करत होता दावा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

kalyan Durgadi Fort: तहसील कार्यलयात बनावट कागदपत्र सादर करत कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर दावा सांगणाऱ्या भामट्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुयश शिर्के सातवाहन असे या व्यक्तीचे नाव आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

kalyan Durgadi Fort

अभिजीत देशमुख

तहसील कार्यलयात बनावट कागदपत्र सादर करत कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर दावा सांगणाऱ्या भामट्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुयश शिर्के सातवाहन असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी त्याने बनावट कागदपत्र सादर केले होते. त्याच्याकडून महात्मा फुले पोलिसांनी बनावट स्टॅम्प देखील हस्तगत केले आहेत.

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शिवकालीन असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतो. सुयश शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज करत दुर्गाडी किल्ला असलेल्या जमिनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखला मागितला होता. दरम्यान शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधिक तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे तहसील प्रशासनाच्या निदर्शनास आले . याप्रकरणी कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी शिर्के यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. अखेर सुयश शिर्के याला नवी मुंबई येथून पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याजवळून बनावट स्टॅम्प देखील जप्त करण्यात आलेत, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT