Kalyan Dombivli water cut google
मुंबई/पुणे

Water Cut : कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट! 'या' भागातील पाणीपुरवठा 3 दिवस राहणार बंद

MIDC Water Supply News : एल निनोमुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन MIDC ने कल्याण- डोंबिवलीसह २७ गावांचा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन केले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा राज्यात कमी पावसाची शक्यता आहे. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) महत्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागानुसार कल्याण तालुक्यातल्या बारवी व शहाड तसेच अंबरनाथ तालुक्यातल्या जांभुळ जवळच्या जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या केंद्रांवर अबलंबून असलेल्या अनेक शहरांमध्ये ३ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

एमआयडीसीच्या अंबरनाथ येथील कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती जाहीर आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागाने मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांना खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश दिले होते. भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पाणी कपात करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनानेही गेल्या आठवड्यापासून 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे. पाणीटंचाईचे वाढते संकट लक्षात घेऊन शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमआयडीसीच्या या नव्या निर्णयामुळे कल्याण, डोंबिवली, शहाड परिसर, औद्योगिक वसाहती तसेच कल्याण ग्रामीण भागातील सुमारे 27 गावांवर परिणाम होणार आहे. विशेषतः कल्याण-शिळफाटा मार्गालगत उभारण्यात आलेल्या नव्या गृहसंकुलांतील रहिवासी आणि विविध व्यावसायिक आस्थापनांना या पाणी कपातीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त दोन दिवसांचा पाणीपुरवठा बंद राहणार नसून त्यानंतरही काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक तेवढाच साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत घरगुती ग्राहकांसोबतच औद्योगिक क्षेत्रालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा परिणामांना पोलिस प्रशासन जबाबदार - लक्ष्मण हाके

पावसाळ्यात डायबिटीजचा धोका का वाढतो?

Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

Engine oil change: किती किलोमीटरनंतर बाईकचं इंजिन ऑईल बदलणं गरजेचं असतं?

फक्त 32 रुपयांत पेट्रोल-डिझेल! गुजरातमध्ये भन्नाट शोध, 60 अ‍ॅव्हरेजचा दावा

SCROLL FOR NEXT