KDMC  Saam tv
मुंबई/पुणे

KDMC चा आणखी एक भोंगळ कारभार; एक्स-रे मशीनचे रजिस्ट्रेशन संपूनही वापर,रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू

kalyan news : कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. एक्स-रे मशीनचे रजिस्ट्रेशन संपूनही वापर सुरू असल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभार उघड

एक्स-रे मशीनचे रजिस्ट्रेशन संपूनही त्याचा वापर सुरू

गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात एक्स-रे मशीनचे रजिस्ट्रेशन संपूनही वापर सुरू असल्याचे सुरू आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

एक्स-रे मशीनचा परवाना ५ वर्षांनंतर नूतनीकरण बंधनकारक असतो आणि नियम न पाळल्यास कारवाई होऊ शकते. देशातील रुग्णालये आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे मशीनसाठी मिळणारा परवाना साधारणपणे पाच वर्षांसाठी वैध असतो. हा परवाना अणुऊर्जा नियामक मंडळ कडून दिला जातो. पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर संबंधित परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असून, नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते.

भारतामध्ये एक्स-रे मशीन बसवण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी थेट बीएआरसी कडून परवाना दिला जात नाही. त्याऐवजी अणुऊर्जा विभागाशी संबंधित असलेली अणुऊर्जा नियामक मंडळ ही नियामक संस्था देशातील एक्स-रे आणि इतर रेडिएशन उपकरणांवर नियंत्रण ठेवते आणि त्यासाठी आवश्यक परवानगी देते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार एक्स-रे मशीनमधून किरणोत्सर्ग निर्माण होत असल्याने रुग्ण, डॉक्टर, तंत्रज्ञ तसेच आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मशीन बसवण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी अणुऊर्जा नियामक मंडळ कडून आवश्यक परवाना घेणे अनिवार्य आहे. मिळालेला परवाना पाच वर्षांनंतर नूतनीकरण न केल्यास संबंधित एक्स-रे मशीनचा वापर करणे बेकायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत अणुऊर्जा नियामक मंडळ कडून मशीन सील करण्यासह दंड किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते म्हणूनच रुग्णालये आणि डायग्नोस्टिक सेंटर चालकांनी एक्स-रे मशीनच्या परवान्याची मुदत वेळेत तपासून त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.पण हे नियम कल्याण डोंबिवलीच्या आरोग्य विभागाने पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विविध कारणांमुळे आधीही टीकेचा धनी ठरलेला केडीएमसीचा आरोग्य विभाग आता पुन्हा वादात सापडला आहे. कल्याणमधील पालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात एक्स-रे मशीनचे रेडिएशन रजिस्ट्रेशन कालबाह्य झाल्यानंतरही त्याचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहितीनुसार, एक्स-रे मशीनसाठी भाभा अणु संशोधन केंद्राकडून आवश्यक असलेले रेडिएशन रजिस्ट्रेशन २०२१ मध्येच संपले होते. मात्र तब्बल पाच वर्ष उलटूनही त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. तरीही हे मशीन रुग्णांच्या तपासणीसाठी वापरले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

या प्रकरणाचा आंबेडकरी युवा मोर्चा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मोर्चाचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत इंगळे यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत, रुग्णालयातील नियमांची पायमल्ली होत असून प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसत आहे. एक्स-रे मशीनचे रजिस्ट्रेशन संपले असतानाही त्याचा वापर करून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापालिका आयुक्तांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री स्तरावर तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी एक्स-रे मशीनसाठी आवश्यक असलेले रेडिएशन रजिस्ट्रेशन संपल्याची बाब मान्य केली. तसेच त्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सामाजिक संस्थेने ही बाब उघड केल्यानंतरच पालिकेच्या प्रशासनाला जाग आली का?असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे आतापर्यंत एक्स-रे तपासणीच्या नावाखाली गरीब आणि गरजू रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता का? असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

UPSC Topper: आधी MBBS; डॉक्टर सोडून दिली UPSC; देशात रँक १ मिळवणारे अनुज अग्निहोत्री आहेत तरी कोण?

Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

Saturday Horoscope: अनावश्यक खर्च टाळा, मेहनतीचे फळ मिळेल; या ४ राशींसाठी शनिवार ठरणार लकी

SCROLL FOR NEXT