Kalyan Dombivli Municipal Corporation News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC : कल्याण-डोंबिवलीत भूमिपुत्रांची पालिकेवर धडक! २७ गावांचा क्लस्टर योजनेला विरोध, कारण काय?

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमध्ये क्लस्टर योजनेविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन करत केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या परिपत्रकाची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला.

Alisha Khedekar

  • २७ गावांमध्ये क्लस्टर योजनेविरोधात तीव्र आंदोलन

  • केडीएमसी मुख्यालयावर नागरिकांचा मोर्चा

  • सरकारी परिपत्रकाची होळी करून निषेध

  • प्रशासनाने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Dombivli Municipal Corporation 27 Village Protest कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये क्लस्टर योजनेला भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला, असून आज शेकडो नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलकांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर सरकारच्या निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करून आपला संताप व्यक्त केला.

केडीएमसी हद्दीतील २७ गावांच्या विकासासाठी शासनाकडून क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही योजना स्थानिक रहिवाशांच्या हिताची नसल्याचा दावा नागरिकांनी केला. आज झालेल्या आंदोलनादरम्यान संतप्त ग्रामस्थांनी महापालिका मुख्यालयासमोर सरकारचा निषेध केला. यावेळी क्लस्टर योजनेशी संबंधित सरकारी परिपत्रकाचे कागद फाडण्यात आले आणि त्याची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध योजनांमुळे २७ गावांतील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. २७ गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती चालणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली.

यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर, आयुक्त, २७ गावांतील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वझे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT