KDMC Commissioner Abhinav Goyal Suspends Two Clerks Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आयुक्तांची मोठी कारवाई! दोन कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन

KDMC Commissioner Abhinav Goyal Suspends Two Clerks : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मालमत्ता कर वसुलीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन लिपिकांना निलंबित करण्यात आले. आयुक्तांच्या अचानक पाहणीनंतर थकबाकीदार व कर्मचाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला.

Alisha Khedekar

  • कर वसुलीत निष्काळजीपणाबद्दल दोन लिपिक निलंबित

  • आयुक्तांची अचानक पाहणी आणि आढावा बैठक

  • अनधिकृत मालमत्तांवर निष्कासनाची धडक कारवाई

  • थकबाकीदारांना आर्थिक वर्षाअखेरीस कर भरण्याचा कडक इशारा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण - डोंबिवली

Kalyan Dombivli Municipal Commissioner Abhinav Goyal Suspends Two Clerks कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या अधिपत्याखाली मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला जात आहे. अशातच आता मालमत्ता कर वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गोयल यांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. 9/आय प्रभागातील कर वसुलीच्या कामात अत्यंत कमी प्रगती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोयल यांनी दोन लिपिकांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले.

मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर संकलन विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच आयुक्तांनी 9/आय व 10/इ प्रभागांना अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त, कर अधीक्षक आणि संबंधित भाग लिपिकांसोबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान कर वसुलीची समाधानकारक कामगिरी न झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 9/आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील यांच्यावर कामातील निष्काळजीपणाबद्दल तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर वसुली अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले. दरम्यान, कर लावण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या सुमारे चार अनधिकृत अनिवासी मालमत्तांवरही निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेने कर थकवणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

मार्च हा चालू आर्थिक वर्षातील कर संकलनाचा शेवटचा महिना असल्याने कर थकबाकीदारांनी तत्काळ कर भरावा, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त-2 योगेश गोडसे यांनी दिला आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे कर थकबाकीदार आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; क्लास वन अधिकारी ठाकरेंना ५० हजारांची लाच घेताना पकडलं

Maharashtra Live News Update: आजारातून बरे झाल्यानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय

Thursday Horoscope: प्रेमातले वाद मिटणार, ५ राशींना गुढीपाडव्याला होणार लाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Influencer Accident:'बिग बॉस' फेम इन्फ्लुएंसरचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचा अक्षरश: चुराडा

महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

SCROLL FOR NEXT