Kalyan Dombivli Muncipal Corporation 2025 - 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण–डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात भरले उमेदवारीचे फॉर्म, युतीत जागा वाटपावरून तेरी भी चूप मेरी भी चूप

Kalyan Dombivli Muncipal Corporation 2025 - 2026 : कल्याणमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप आणि शिवसेना पॅनल एकत्र उतरले असले तरी जागावाटपाचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नाही.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये महायुती उमेदवारांचा ढोल-ताशांसह अर्ज दाखल

  • भाजप-शिंदे गट पॅनल अनेक प्रभागांत एकत्र उतरले

  • जागावाटपाचा अधिकृत आकडा अद्याप गुप्त

  • आमदार राजेश मोरे यांनी जागा संख्येच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात एकीकडे उमेदवारी न मिळाल्याने नाराजी नाट्य सुरु असून, कल्याण–डोंबिवलीत महायुतीतील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होताच शहराच्या राजकारणात चांगलाच उत्साह संचारला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन करत निवडणूक प्रभाग कार्यालयांच्या दिशेने उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले . मात्र पार्श्वभूमीवरही जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत आकडे जाहीर करण्यात आलेले नसल्याचे चित्र दिसत आहे.

केडीएमसी निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात महायुतीतील उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. अनेक प्रभागांमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांचे पॅनल असल्याने चारही उमेदवार एकत्र येत ढोल–ताशांच्या निनादात अर्ज भरण्यासाठी निघाल्याचे चित्र दिसून आले. डोंबिवली पूर्वेत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयाकडे कूच करताना पाहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांचा आनंद ,उत्साह, घोषणाबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत करत शक्ती प्रदर्शन करत असल्याचं दिसून आले तर दुसरीकडे, काही भाजपचे उमेदवार शिवसेना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्यासोबत घोषणाबाजी करत अर्ज भरण्यासाठी जाताना दिसून आले.

यावेळी उमेदवारांचे आमदारांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, माध्यमांनी आमदार राजेश मोरे यांना कल्याण–डोंबिवलीत नेमक्या किती जागा मिळाल्या, असा सवाल केला असता आमदार राजेश मोरे यांनी या मुद्द्यावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे भाजप व शिवसेना यांच्यात नेमके जागावाटप कसे झाले आणि कोणत्या प्रभागात कोण लढणार, याबाबत अद्याप गोपनीयता पाळली जात असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT