Kalyan crime 
मुंबई/पुणे

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

Kalyan crime : कल्याण-डोंबिवली परिसरात व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेज पाठवून तरुणीला लॉजमध्ये बोलावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला पकडले.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे | साम टीव्ही न्यूज | डोंबिवली

Kalyan WhatsApp harassment case woman traps accused : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणींना जाळ्यात ओढण्याल्याच्या घटना मुंबई, पुण्यासह देशभरातून समोर येत आहेत. यातच आता डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून एका अनोळखी तरुणीला लॉजमध्ये भेटण्यासाठी तगादा लावला. त्या तरूणीला पैशांचे आमिषही दाखवण्यात आले होते. वैतागलेल्या तरूणीने जावेद खानला नातेवाईकांच्या मदतीने चांगलाच धडा शिकवला.

जावेद खान हा मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात राहणारा विवाहित व्यावसायिक आहे. त्याने वांगणी येथील एका तरुणीशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. जावेद त्या तरूणीला पैशांचे आमिष दाखवून लॉजमध्ये बोलवत होता. तरूणीकडून नकार असतानाही वारंवार तो तिला बोलवत होता. कोणतीही ओळख नसताना अशा प्रकारचा अश्लील प्रस्ताव आल्याने तरुणी सतर्क झाली. तिने कुटुंबाच्या मदतीने त्याला चांगलाच धडा शिकवला.

जावेद खान याच्या या भयंकर कृत्याबाबत तरुणीने लगेच आपल्या नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर नातेवाईकांनी सापळा रचून जावेद खानला भेटण्यासाठी बोलावले. ठरलेल्या ठिकाणी येताच नातेवाईकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. नातेवाईकांनी जावेद याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी जावेद खानला अटक केली आहे. पोलिसांनी जावेद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेजुरीतील अपघातातील जखमी वारकऱ्यांवर उपचार सुरू; प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

Daily push-ups: दररोज ३० पुशअप्स मारल्याने शरीरात कोणते बदल होतात?

महागड्या क्रीम्स कशाला? वय वाढलं तरी २१ वर्षांसारखं तरुण दिसाल; 'ही' ६ योगासनं देतील काचेसारखी स्वच्छ त्वचा

पंढरीच्या वाटेवर काळाचा घाला! ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रकने वारकऱ्यांने चिरडले, 3 महिलांचा मृत्यू; नावे आली समोर

Snake And Scorpion : घराच्या कोपऱ्यात लपलाय साप किंवा विंचू? हा घरगुती उपाय करताच एका मिनिटात पळ काढतील

SCROLL FOR NEXT