Kalyan Crime Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News : हॉर्न वाजवण्यावरून वाद, गाडी फोडली, पिस्तूल काढलं अन्...; कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Kalyan Crime News in Marathi : हॉर्न वाजवण्यावरून धक्कादायक प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉर्न वाजवण्यावरून गाडी फोडली आणि पिस्तूल काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून गाडी काच फोडली इतकेच नव्हे तर पिस्तूल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली सागाव परिसरात घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे . या प्रकरणानंतर तीन तलवारी, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे जनार्दन भोईर हे त्यांच्या पत्नीसह 20 ऑक्टोबर रोजी याच परिसरातून गाडीने घरी परतत होते. त्यावेळी गाडी समोर दोन जण आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवला. याच हॉर्न वाजवण्यावरून जनार्दन भोईर आणि या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वाद घालणाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास जनार्दन भोईर यांच्या कारच्या काचा फोडल्या.

दोघे ओळखीचे असल्याने जनार्दन भोईर यांचा भाऊ निलेश दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जाब विचारण्यात गेले. या दोघांनी पुन्हा निलेश भोईर यांच्या इमारतीत जाऊन निलेश भोईर यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर निलेश यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी आरडाओरड केल्याने या दोघांनी तिथून पळ काढला.

शेजारच्या इमारतीत पळून गेले. त्यांनी पिस्तूल आणि हत्यारही एका बॅगमध्ये भरून ती बॅग शेजारील इमारतीमध्ये ठेवली होती. आसपासच्या नागरिकांनी या दोघांना पकडून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतलं. त्या इमारतीमधील बॅग शोधत बॅगेतील तीन तलवारी, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस ताब्यात घेतली.

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत निर गुटेला आणि नितेश गुप्ता या दोघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार पसार झाले असून फरार आरोपींमधील दोन जण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

Sanjiv Khanna: संजीव खन्ना असतील देशाचे पुढील सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Ramtek Assembly Constituency : रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT