अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत  saam tv
मुंबई/पुणे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत

सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदिप भणगे

डोंबिवली (Dombivali) : अतिवृष्टीमुळे (HeavyRain) कल्याण-डोंबिवली (kalyan-Dombivali) परिसरातील नदी व खाडी किनारी राहणाऱ्या तसेच सखल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने (Tahsildar) त्वरित पंचनामे (Punchnama) करून त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.  (The tehsil office should conduct a panchnama for the damage caused by heavy rains)

डोंबिवली पश्चिम खाडी परिसर, मोठागाव, ठाकुर्ली , दिवा परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधुनीनजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आणि त्यांच्या गृहोपयोगी वस्तू, विजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे त्वरित करावे आणि तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत सरकारला द्यावा अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT